Monday, May 6, 2024

अकेली

Akelli
अकेली
ज्योती पंजाबच्या छोट्या गावात आपली आई आणि पुतणीसोबत राहतेय.तिचा भाऊ आणि वहिनी केदारनाथ यात्रेत अपघातात गेले. ती एअरपोर्टवर काम करत होती पण तिथेही तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून काढून टाकले जाते.आता तिच्याकडे उदरनिर्वाहचे साधन नाही.नाईलाजाने ती मोसुल शहरात एका गारमेंट फॅक्टरीत जॉब स्वीकारते.मोसुल इराकमध्ये आहे आणि आता इराकमध्ये आयसिसने हल्ला केलाय.
खरे तर तिची फॅक्टरी खूप चांगली आहे.सर्वजण एकत्र राहातायत पण आयसिसवाले कधीही येऊ शकतात ही भीती त्यांना आहे आणि एके दिवशी ती खरी होते. त्या फॅक्टरीत आयसिस येते आणि सर्वाना बंदी बनवून दुसरीकडे हलविले जाते.
आयसिसच्या कडेकोट बंदोबस्तातून ज्योतीची सुटका होईल ??
होय.. ज्योती आपली सुटका करून घेते पण त्यात आयसिसचा प्रमुख नेता जखमी होतो.ज्योती इराकी आर्मीच्या ताब्यात येते पण मोसुलचा एअरपोर्ट आयसिसच्या ताब्यात आहे.तिथून बाहेर पडणे अश्यक्य आहे .
भारतीय दूतावास, इराकी दूतावास ज्योतीला मदत करायची इच्छा असूनही काही करू शकत नाही.एअरपोर्टवरून देशाबाहेर पडणे हे ज्योतीलाच करावे लागेल .ती यशस्वी होईल का ??
नुशरत भरूचाची प्रमुख भूमिका असलेला हा थरारक चित्रपट जिओसिनेमावर आहे.

Saturday, May 4, 2024

रणनीती

Ranneeti : Balakot and Beyond
रणनीती :बालाकोट अँड बियोंड 
कश्यप सिन्हा ही दोन आडनावाची व्यक्ती एकेकाळी रॉची उत्कृष्ट फिल्ड एजंट होती. पण सर्बियातील त्याची एक मोहीम फेल झाली आणि त्याचुकीची शिक्षा म्हणून त्याची बदली रक्षा मंत्रालयात टेबल वर्कवर झालीय.आता तो चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचून ओके करतो.
 सर्बियातील त्या अपयशी मोहिमेत कोणीतरी फितूर आहे अशी त्याला खात्री आहे .त्यासाठी तो अजूनही पुरावे शोधतोय.अश्याच कामासाठी तो तिहार जेलमधील एका अतिरेक्याला भेटतो आणि वेगळीच माहिती त्याच्या समोर येते.
तो संरक्षण सचिव दत्ता याना भेटून भारतावर अतिरेकी हल्ला होणार आहे असे सांगतो. पण दत्ता त्याकडे दुर्लक्ष करतात.पण काही दिवसांनी पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला होतो आणि सुमारे चाळीस सैनिक शाहिद होतात.
दत्ता ताबडतोब कश्यपला बोलावून घेतो. पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर हवाई हल्ला करू अशी कश्यपची योजना आहे .दत्ता त्याच्या जोडीला मनीषाला देतो. मनीषा ही आजची आघाडीची पत्रकार आहे.मीडियावर तिचा होल्ड आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात मनीषा उपयोगी पडेल याची दत्ताना खात्री आहे .
हवाई हल्ला केल्यानंतर खरे युद्ध सुरू होईल असे दत्ता याना वाटते.हे युद्ध जमीन आकाश पाणी यावर नसेल तर सोशल मीडिया ,इंटरनेट यावर असेल याची त्यांना खात्री आहे.हल्ला झाल्यावर पुढे घडणाऱ्या परिणामांवर विचार करावा लागेल आणि त्यासाठी तयार राहावे लागेल .एक परिपूर्ण योजना तयार करून बालाकोट येथील अतिरेकी तळ भारतीय वायुसेना उध्वस्त करते.
पण हे इथेच थांबत नाही .पाकिस्तानही हवाई हल्ल्याच्या तयारीत येतो. पण विंग कमांडर अभिमन्यूचे पन्नास वर्षे जुने M 21 त्यांचे हल्ले अयशस्वी करते आणि त्यांचे अत्याधुनिक फायटर जेटही पाडते. यात विंग कमांडर अभिमन्यूचे जेट ही पाकिस्तानात कोसळते. विंग कमांडर अभिमन्यू पाकिस्तानात कैदी बनतो.
त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात चोवीस तासात परत आणा अशी ऑर्डर पंतप्रधानांकडून दत्ताना येते.
आता कश्यप ,मनीषा आणि दत्ता त्याला परत आणण्यासाठी कोणती खेळी खेळतात हे पाहणे रोमांचकारी आणि थरारक आहे.आपल्याला भारतीय सैन्याच्या मोहिमा दिसतात पण त्यामागे कोणती रणनीती आणि राजकारण आहे आणि ते कश्या पद्धतीने खेळले जाते हे ही सिरीज बघून कळते.
जिमी शेरगिलने कश्यप सिन्हा वेगळ्या पद्धतीने रंगविला आहे.तर लारा दत्ता टिपिकल मीडिया पत्रकार दिसते.आशिष विद्यार्थीचा दत्ता नेहमीसारखा.आशुतोष राणाही एका प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे .
एका वॉर रूम मध्ये घडणारी ही सिरीज जिओ सिनेमावर मोफत आहे .पडद्यामागील राजकारण काय असते हे पाहण्यासाठी रणनीती नक्की पहा.

Wednesday, May 1, 2024

मॉंक

MONK
मॉंक
एड्रीयन मॉंक एक हुशार पोलीस अधिकारी .इतरांच्या लक्षात येणार नाहीत अशा गोष्टीतून तो पुरावे शोधून काढतो.पण तितकाच विचित्र .एका अपघातात त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि तो मानसिक रुग्ण बनतो.आता त्याची चौकशी चालू आहे. मानसोपचार तज्ञ त्याच्यावर उपचार करतायत.
मॉंकला काही विचित्र सवयी आहेत.तो स्वच्छतेबाबत खूपच जागरूक आहे.त्याला कोणी स्पर्श केलेला आवडत नाही.तो कोणाशी हात मिळवत नाही.नाईलाजाने हातात हात घेतला की ताबडतोब हात टिशू पेपरने पुसून टाकतो. त्याला रस्त्यावरील पिलर मोजायची सवय आहे. वस्तू जाग्यावर आणि व्यवस्थित ठेवलेल्या आवडतात.इतकेच काय तो दुसऱ्यांच्या कोटावरचे डाग ही साफ करतो.
शरोना ही त्याची केयर टेकर आणि सेक्रेटरी . ती त्याची काळजी घेते .मॉंक तिला वेळेवर पगारही देत नाही तरीही तिला मॉंकची काळजी आहे. काही विचित्र केस घडल्या तर पोलीस मॉंकची मदत घेतात आणि मॉंक त्या सहज सोडवतो.
प्रत्येक भागात वेगवेगळ्या केसेस मॉंक कश्या सोडवतो हे पाहणे आश्चर्यकारक आहे .
विनोदी अंगाने जाणारी ही सिरीज नेटफ्लिक्सवर इंग्रजी भाषेत आहे हिंदी सबटायटल सहित आहे.

Friday, April 26, 2024

इन्स्पेक्टर ऋषी

इन्स्पेक्टर ऋषी
Inspector Rishi
दक्षिणेतील घनदाट जंगलात एका वन्यजीव फोटोग्राफरची रहस्यमय हत्या होते. त्याच्या संपूर्ण देहावर जाळे विणले गेलेले असते.इन्स्पेक्टर ऋषीची या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी येते. इन्स्पेक्टर ऋषी धाडसी ऑफिसर आहे.एका चकमकीत त्याने आपला एक डोळा आणि बायको गमावली आहे.
इन्स्पेक्टर ऋषीला मदतीसाठी चित्रा आणि अय्यंगार दिले जातात.जंगलातील वनराची नावाच्या देवीने ही हत्या केलीय असा सर्वांचा समज झालाय.पुढे अश्याच पद्धतीने काही हत्या होतात.आता ऋषींच्या मदतीला फॉरेस्ट ऑफिसरची टीमही आलीय. सत्या हा तरुण फॉरेस्ट ऑफिसर आणि त्याची सहकारी कॅथी  ऋषींच्या मदतीला तयार आहे.
असा कोणता किडा आहे जो पटकन मृतदेहाभोवती जाळे विणतो हे ऋषीला शोधून काढायचे आहे आणि ज्या हत्या झाल्या त्याचा परस्परांशी काय संबंध आहे याचा ही तपास करायचा आहे.
वनराची रात्रीच्या अंधारात बऱ्याच लोकांना दिसते त्यामुळे गावकरी रात्री घराबाहेर पडत नाहीत.
इन्स्पेक्टर ऋषी या प्रकरणाच्या मुळाशी जाईल का ? वनराची तर त्याच्याही मागे आहे. 
ह्या हत्यांच्या मागे कोण आहेत ??
प्राईम व्हिडिओवर ही दहा भागांची हिंदी मालिका आपला श्वास रोखून धरते.

Wednesday, April 17, 2024

क्रुक्स

Crooks
क्रुक्स
चार्ली एक हुशार चोर .असे कोणतेही लॉक नाही जो तो उघडू शकत नाही.आता तो सर्व सोडून शांत आयुष्य जगतोय. त्याची बायको प्राण्यांची डॉक्टर आहे आणि एक  छोटा मुलगा आहे.
बर्लिनच्या म्युझियममधून एका जुन्या प्राचीन नाण्याची चोरी होते.  आता संपूर्ण जर्मनीचे माफिया त्या नाण्याच्या शोधात आहे.या सगळ्यात मृत्यूशय्येवर असलेला बिग बॉसही आहे.बिग बॉस मेल्यावर त्याची संपत्ती आणि खुर्ची कोणाला मिळेल याची उत्सुकता त्याच्या भावाला आणि इतरांना आहे.पण त्याने आपली संपत्ती आपल्या अनौरस मुलाच्या जोसेफच्या नावावर केलीय .
जोसेफ एक जाडजूड तरुण. ज्याला या प्रकरणात अजिबात रस नाही.तो फक्त बिग बॉसच्या हॉटेलमध्ये तरुणींना आणायचे आणि नेण्याचे काम करतोय.सर्व जण त्याला हसतात ,मूर्ख समजतात.
ते नाणे चोरांनी आता एका तिजोरीत ठेवले आहे.एक माफिया टोळी चार्लीवर  दबाव टाकून ती तिजोरी फोडायला भाग पडतात . त्यांना ते नाणे बिग बॉसच्या भावाला द्यायचे आहे. नाणे आणायला जोसेफची निवड होते.जोसेफ चांगला ड्रायव्हर आहे.
जोसेफ ,चार्ली आणि इतर तिजोरीतून नाणे पळविण्यासाठी एकत्र येतात .नाणे चार्लीच्या हातात येते पण शत्रूला त्याची खबर लागते.ते चार्ली आणि जोसेफच्या पाठी लागतात . ते नाणे जोपर्यंत चार्लीकडे आहे तोपर्यंत त्याचे कुटुंब सुरक्षित आहे.
चार्ली त्या नाण्याच्या बदल्यात आपल्या कुटुंबाला वाचवेल का ??
नेटफ्लिक्सवर ही मूळ जर्मन सिरीज हिंदी भाषेत आहेत.पहिल्या भागापासून अतिशय वेगवान असलेली सिरीज आपल्याला नक्कीच गुंतवून ठेवते.

Tuesday, April 16, 2024

द वॉक

The Walk
द वॉक
स्वप्न प्रत्येकजण पाहतो .काहींची स्वप्ने अशक्य असतात त्यामुळे ती स्वप्नच राहतात पण काहीजण अशक्य स्वप्नच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. 
फिलिप पेटीट्स त्यातीलच एक स्वप्नवेडा तरुण. फिलिप मुळात फ्रान्सचा .त्याला तारेवरून चालायचे वेड आहे.जिथे दोन झाडे की तो दोरी बांधून त्यावरून चालायचा .पापा रुडी हे सर्कशीतील प्रसिद्ध नाव. फिलिप पापा रुडीच्या हातापाया पडून त्यांचा शिष्य झाला .
असेच तारेवरून चालताना त्याला अँनी भेटली. एक दिवस दातांच्या डॉक्टरकडे गेला असताना त्याला न्यूयॉर्क शहरात बांधण्यात येणाऱ्या ट्वीन टॉवरची बातमी दिसली आणि त्या दोन टॉवरच्या टोकावर तार बांधून त्यावरून चालायचे. पण हे इतके सोपे नव्हते . 1974 साली दोन्ही टॉवरचे काम पूर्ण होत आले होते.
फिलिपने एक टीम तयार केली . दोन्ही टॉवरची अनेक वेळा वेगवेगळ्या वेशात पाहणी केली.तार कशी बांधायची हे पापा रुडीकडून शिकून घेतले .
फिलिप एक अशक्य अशी गोष्ट करतोय. त्याला फक्त  त्याचे मित्र साथ देतायत. हे साहस तो पूर्ण करेल का ??
एका अलवियाचे अचंबित करणारे अशक्य असे साहस तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावेल. तुम्ही फिलिपच्या निडर आणि आत्मविश्वासाने भरलेल्या स्वभावाच्या प्रेमात पडाल.
चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे.नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, April 11, 2024

द वेडिंग गेस्ट

The Wedding Guest
द वेडिंग गेस्ट
जय वेगळ्या पासपोर्टने पाकिस्तानात आलाय. तिथे समीराचे लग्न होणार आहे.समीराचा मित्र म्हणून त्याने तिथे प्रवेश केलाय.आता तो समीराची वाट पाहतोय. समीरा ही ब्रिटिश नागरिक आहे. तिचे लग्न पाकिस्तानात होतेय.जय समीराच्या घरात घुसून तिचे अपहरण करतो त्यात सिक्युरिटी गार्ड मारला जातो.
समीरला गोव्यामार्फत पुन्हा इंग्लंडला घेऊन जाण्याचे जयचे प्लॅनिंग आहे.खरे तर जय पक्का व्यावसायिक आहे. समीराला दिपेशच्या ताब्यात देणे हेच त्यांचे काम आहे.त्यासाठी त्याने पुरेसे पैसे घेतले आहेत.दिपेश त्यांना दिल्लीत भेटणार असे ठरलेले असते .पण सिक्युरिटी गार्डच्या हत्येमुळे दिपेश घाबरतो.दिपेशचा घराचा हिऱ्यांचा बिझनेस आहे.तो  समीरावर प्रेम करतो.
पण आता दिपेशला समीराशी संबंध ठेवायचे नाहीत.तो पुन्हा जयला पैसे देऊन समीराला पाकिस्तानात सोडायला सांगतो.
जय पुन्हा समीराला पाकिस्तानात सोडेल ?? समीरा त्याच्यासमोर एक प्रस्ताव ठेवते. तो प्रस्ताव जय स्वीकारेल का ?? 
एक मोठा प्रवास जो तुम्हाला पाकिस्तान दिल्ली जयपूर गोवा असे फिरवतो .
राधिका आपटे ,देव पटेल, जिम सारभ हे  तीनच प्रमुख कलाकार चित्रपटात आहे.शेवटी चित्रपट एका रहस्याकडे वळतो .
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे .