Monday, July 31, 2023

THE COVENANT

THE COVENANT
द कॉवेनंट
अफगाणिस्तानात जेव्हा अमेरिकी सैन्य तालिबानच्या मागावर होते तेव्हा त्यांना दुभाष्याची गरज लागत होती.हे दुभाषीही त्यांना नीट पारखून घ्यावे लागत.
जॉन किंली आणि त्याची त्याची टीम अफगाणिस्तानातील शेवटच्या दौऱ्यात होती.त्यांचा दुभाषी मारला गेला होता .आता त्यांना अहमद नावाचा दुसरा दुभाषी भेटला होता.अहमद मितभाषी शांत होता त्याची निर्णय घेण्याची क्षमता होती.आत्मविश्वास होता. 
तालिबानचे हत्यारांचे कारखाने शोधणे आणि ते नष्ट करणे हे जॉनच्या तुकडीचे प्रमुख काम. साधारणतः सैनिक आणि दुभाषाचे एक ट्युनिंग जुळायला लागते.जॉनचा अहमदवर फारसा विश्वास नव्हता .कदाचित ते पहिल्यांदाच एकत्र काम करत होते म्हणून असावे.पण अहमदची जॉनला खूप मदत झाली .
एके दिवशी बेसपासून साधारण 120 किलोमीटर दूर तालिबानचा शस्त्रांचा कारखाना आहे अशी बातमी जॉनच्या तुकडीला लागते. बेसपासून साधारण तीन तासांचा प्रवास जॉन आणि त्याची तुकडी सुरू करते. 
हातघाईची लढाई होऊन जॉन तो कारखाना नष्ट करतो पण दुर्दैवाने त्याला अपेक्षित नसलेले शेकडो तालिबानी त्यांच्यावर हल्ला करतात .हा हल्ला इतका जोरदार असतो की त्यात जॉनचे सगळे साथीदार मारले जातात .पण अहमद आणि जॉन तेथून निसटतात आणि जंगलाचा आश्रय घेतात .तिथे सगळीकडे तालिबान पसरलेले असतात . ते दोघांच्याही मागावर निघतात . त्यात जॉनच्या मांडीला गोळी लागून तो भयंकर जखमी होतो .
आता अहमदवर संपूर्ण जबाबदारी आहे जॉनला सुमारे शंभर किलोमीटर दूर असलेल्या बेस कॅम्पवर घेऊन जायची .रस्तोरस्ती तालिबान सैनिक त्या दोघांच्या शोधात आहेत. त्यामुळे जॉनला गाडीने घेऊन न जाता डोंगरदऱ्यातून हातगाडीवरून खडतर मार्गाने अहमदला जॉनसोबत प्रवास करायचा आहे. अहमद जॉनला सुरक्षितस्थळी पोचवेल का ??
चित्रपट इथेच संपत नाही .तर त्यापुढचा भाग अजून रोमांचकारी आहे .तो पाहायचा असेल तर अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट जरूर पहा .
मानवी नात्यांचा आणि सदसदविवेकबुद्धी जोपासणारा सुंदर चित्रपट 

Sunday, July 30, 2023

HIDDEN STRIKE

HIDDEN STRIKE
हिडन स्ट्राईक
बगदादमधील वैराण वाळवंटात ती ऑइल रिफायनरी आहे. ती रिफायनरी चायनाच्या ताब्यात आहे.आता त्यांना ती रिफायनरी बंद करून ग्रीन झोनमध्ये जायचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना तेथून घेऊन जाण्यासाठी कॅप्टन लु फेंग त्याच्या तुकडीसह रिफायनरी दाखल झालाय. प्रमुख स्त्रीने रिफायनरीचा सगळा डेटा पेन ड्राईव्हवर कॉपी करून तो लु फेंगच्या मुलीकडे देते.लु फेंग आणि त्याच्या मुलीचे फारसे पटत नाही .हायवेच्या डेड झोनमधून जाताना अचानक गाड्यांवर हल्ला होऊन एका बसचे अपहरण होते.
क्रिस त्या वाळवंटातील छोट्या गावात एक अनाथाश्रम चालवितो.पाण्यासाठी पैश्याची गरज आहे म्हणून तो आपल्या भावाला त्या बसचे अपहरण करण्यात मदत करतो पण भावाच्या काही गोष्टी पटत नाहीत म्हणून तो पुन्हा गावी निघून येतो .बसमधील ओलीस ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडून अपहरणकर्त्याना तो पेन ड्राईव्ह हवाय.
लु फेंग आणि त्याची मुलगी क्रिसच्या मदतीने ओलिसांची कशी सुटका करतात हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
लु फेंगच्या भूमिकेत जॅकी चेनने नेहमीप्रमाणे धमाल केलीय .यावेळी त्याच्या साथीला जॉन सीना आहे. या चित्रपटातील ऍक्शन बघण्यासाठी आहे. फाईट सीन पाहताना आपण जॅकी चेनच्या जुन्या काळात जातो.
प्रत्येक जॅकी चेन प्रेमींनी कुटुंब सोबत पाहायला हवा असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

Saturday, July 29, 2023

WOMAN OF THE DEAD

WOMAN OF THE DEAD
वुमन ऑफ द डेड
मार्क एक  प्रामाणिक पोलीस ऑफिसर . त्याची पत्नी ब्लूम प्रेतांना अंत्यसंस्कारासाठी सजविण्याचे काम करते. त्यांना दोन छोटी  मुले आहेत. मार्कचे वडीलही त्यांच्यासोबत राहतात.
एक दिवस घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असताना मार्कचा भयानक अपघात होतो आणि तो मरतो. हे सगळे ब्लूमच्या समोरच घडते.
काही महिने उलटतात तरी मार्कचा अपघात करणाऱ्या गाडीचा शोध लागत नाही . मार्कची मोटारसायकल मॅकेनिक तयार करून ब्लूमच्या हवाली करतो .त्यात मार्कचा मोबाईलही असतो.
मार्कच्या फोन कॉलमध्ये एक नंबर सारखा दिसत असतो .ब्लूम त्या नंबरवर फोन करते तेव्हा पलीकडून एक स्त्री बोलत असते.ब्लूम तिचा माग काढते आणि तिला घरी आणते.तिच्या बोलण्यातून ब्लूमला कळते मार्कचा अपघात नसून खून करण्यात आला आहे.
ब्लूम एक एक पुरावा शोधत जाते आणि अनपेक्षित सत्य शोधून काढते.
जर्मनीतील बर्फाच्छदीत छोट्याश्या गावात ही सिरीज चित्रित केली आहे.अतिशय निसर्गरम्य बर्फाच्छदीत डोंगररांगा, निर्मनुष्य रस्ते , कमी लोकवस्ती यामुळे सिरीजला वेगळेपणा आलाय .
सहा भागाची ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .
.

Friday, July 28, 2023

THE POP'S EXORCIST

द पोपस एक्झॉसिस्ट
THE POP'S EXORCIST
फादर गॅब्रिएल अमोर्थ हा इतर फादरपेक्षा थोडा वेगळा आणि थोडा घमेंडी होता.कधीकधी नियमांच्या बाहेर जाऊनही काम करायचा. सैतानांपासून लोकांना मुक्त करणे हे त्याचे काम .
आजही त्याच्यासाठी एक काम आलेय.पोपने स्वतः त्याला ते काम दिलंय. स्पेनमध्ये एका छोट्या गावात जुने चर्च आहे. जुलिया नावाच्या विधवेच्या नावावर हे चर्च आहे.तिला ते वारसा हक्काने मिळाले आणि त्याची थोडीफार दुरुस्ती करून तिला ते विकायचे आहे .तिला एमी नावाची मुलगी आणि हेन्री नावाचा छोटा मुलगा आहे. सध्या ते चर्चमध्ये राहायला आलेत .
हेन्रीला सैतानाने झपाटले आहे आणि त्याला बरे करण्याची जबाबदारी गॅब्रियलवर येते. गॅब्रियलच्या मदतीसाठी फादर थॉमसही तिथे हजर असतो. गॅब्रियलला पाहताच हेन्रीतील सैतान खुश होतो . त्याला गॅब्रियलचा संपूर्ण इतिहास माहीत आहे इतकेच नव्हे तर तो फादर थॉमसच्या काही खाजगी गोष्टी सांगतो.या सैतानाने नाव कळल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही असे गॅब्रियल थॉमसला सांगतो आणि तो त्या चर्चमध्येच शोध घेण्यास सुरुवात करतो .
सैतान फक्त गॅब्रियलवर सूड उगविण्यासाठीच हेन्रीच्या शरीरात शिरलाय हे गॅब्रियलला कळते.आता तो हेन्रीबरोबर स्वतःचीही सुटका कशी करेल हे पाहण्यासारखे आहे.
फार वर्षांपूर्वी excorcist नावाचा चित्रपट आला होता.त्यातील काही दृश्यतर भयानक होती. यातील बरीचशी दृश्य संयमित आहेत.
रसेल क्रोसारखा दमदार अभिनेता फादर गॅब्रियलच्या भूमिकेत छाप पाडून जातो .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .
ज्यांना हॉरर दृश्य आवडत नसतील त्यांनी हा चित्रपट पाहू नये.

द ग्लोरी

द ग्लोरी
THE GLORY
बदला घ्यायचा ठरला तर त्यासाठी कितीही वर्ष वाट पहायची तयारी ठेवावी लागते. बदला घेणारे संधीची वाट पाहत असतात .काहीजण डायरेक्ट आक्रमण करतात काहीजण हळूहळू बदला घेतात.
मून डाँग गरीब विद्यार्थिनी .तिचे शाळेत रोज रॅगिंग होत असते.रॅगिंग करणाऱ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो .त्यात तीन मुली आणि दोन मुले असतात .टॉयलेट साफ करायला लावणे , अंगावर ड्रायर आणि इस्त्रीचे चटके देणे शिवाय प्रचंड मारहाण तिला रोज होत असते .
ती याविरुद्ध पोलिसात तक्रार करते पण ही सर्व मोठ्या घरातील मुले असल्यामुळे हिलाच बोलणी ऐकावी लागतात .बऱ्याचदा तिला आत्महत्या करावीशी वाटते .या आधीही एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली असते. 
मून डाँगला तर घरुनही सपोर्ट नसतो .शेवटी ती कंटाळून शाळा सोडायचे ठरविते .ती शाळा सोडायचे खरे कारण देते आणि त्या पाचही विद्यार्थ्यांची नावे लिहिते .पण तिच्यावर त्यांची नावे काढून टाकण्याचे दडपण येते ती नकार देताच शिक्षक तिला मारहाण करतात . मग तिच्या आईला पैसे देऊन प्रकरण मिटविले जाते .
मून डाँग आता दिवसरात्र त्यांच्या मागावर आहे.ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण करते शिक्षिका बनते.पण आपल्याला त्रास देणारे सर्वच तिच्या रडारवर आहे. आता या गोष्टीला अठरा वर्षे पूर्ण झालीत .तिच्याकडे प्रत्येकाची  सखोल माहिती आहे .
आता तिचा बदला सुरू होणार आहे .ती प्रत्येकाला सजा देणार आहे पण प्रत्यक्षात ती कोणाला मारणार नाही.त्यांचे इगो ,सवयी ,सामाजिक प्रतिष्ठा यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणार आहे.यातून कोणी म्हणजे कोणीच वाचणार नाही .
तुम्हाला हा सूडपट पाहायचा असेल तर कोरियन सिरीज द ग्लोरी नक्कीच पहा. अतिशय कमी हिंसाचार असलेली थोडी संथ पण उत्कंठा वाढवीत जाणारी ही सिरीज आपल्याला नक्की आवडेल .
सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Wednesday, July 26, 2023

द ग्लोरी

द ग्लोरी
THE GLORY
बदला घ्यायचा ठरला तर त्यासाठी कितीही वर्ष वाट पहायची तयारी ठेवावी लागते. बदला घेणारे संधीची वाट पाहत असतात .काहीजण डायरेक्ट आक्रमण करतात काहीजण हळूहळू बदला घेतात.
मून डाँग गरीब विद्यार्थिनी .तिचे शाळेत रोज रॅगिंग होत असते.रॅगिंग करणाऱ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो .त्यात तीन मुली आणि दोन मुले असतात .टॉयलेट साफ करायला लावणे , अंगावर ड्रायर आणि इस्त्रीचे चटके देणे शिवाय प्रचंड मारहाण तिला रोज होत असते .
ती याविरुद्ध पोलिसात तक्रार करते पण ही सर्व मोठ्या घरातील मुले असल्यामुळे हिलाच बोलणी ऐकावी लागतात .बऱ्याचदा तिला आत्महत्या करावीशी वाटते .या आधीही एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली असते. 
मून डाँगला तर घरुनही सपोर्ट नसतो .शेवटी ती कंटाळून शाळा सोडायचे ठरविते .ती शाळा सोडायचे खरे कारण देते आणि त्या पाचही विद्यार्थ्यांची नावे लिहिते .पण तिच्यावर त्यांची नावे काढून टाकण्याचे दडपण येते ती नकार देताच शिक्षक तिला मारहाण करतात . मग तिच्या आईला पैसे देऊन प्रकरण मिटविले जाते .
मून डाँग आता दिवसरात्र त्यांच्या मागावर आहे.ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण करते शिक्षिका बनते.पण आपल्याला त्रास देणारे सर्वच तिच्या रडारवर आहे. आता या गोष्टीला अठरा वर्षे पूर्ण झालीत .तिच्याकडे प्रत्येकाची  सखोल माहिती आहे .
आता तिचा बदला सुरू होणार आहे .ती प्रत्येकाला सजा देणार आहे पण प्रत्यक्षात ती कोणाला मारणार नाही.त्यांचे इगो ,सवयी ,सामाजिक प्रतिष्ठा यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणार आहे.यातून कोणी म्हणजे कोणीच वाचणार नाही .
तुम्हाला हा सूडपट पाहायचा असेल तर कोरियन सिरीज द ग्लोरी नक्कीच पहा. अतिशय कमी हिंसाचार असलेली थोडी संथ पण उत्कंठा वाढवीत जाणारी ही सिरीज आपल्याला नक्की आवडेल .
सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Tuesday, July 25, 2023

UNKNOWN

UNKNOWN
अंनोन
डॉ. मार्टीन हॅरीस आणि त्याची पत्नी लिझ एका बायोटेक्नॉलॉजी कॉन्फरन्ससाठी बर्लिनला आलेत.
बर्लिनला ते पहिल्यांदाच येतायत असे मार्टिन म्हणतोय.ते आपल्या हॉटेलमध्ये शिरतात आणि आपली बॅग टॅक्सीत किंवा गाडीत विसरलोय असे त्याच्या लक्षात येते .
तो ताबडतोब मागे फिरतो आणि मिळेल ती टॅक्सी पकडून आपल्या टॅक्सीच्या मागे लागतो.पण त्याच्याच टॅक्सीला अपघात होऊन ती पाण्यात कोसळते .टॅक्सी ड्रायव्हर जिना त्याला वाचवते पण ती बर्लिनला अनधिकृतपणे राहत असल्यामुळे तिथून पळून जाते.
मार्टिनला जेव्हा जाग येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो.तो चार दिवस कोमात होता आणि त्याला प्रथम काही आठवत नसते. हळू हळू त्याला थोडे थोडे आठवते आणि तो हॉटेलमध्ये जातो. पण तिथे डॉ मार्टिन हॅरीस नावाची दुसरीच व्यक्ती हजर असते. इतकेच काय त्याची पत्नीही त्याला ओळखायला नकार देते.तोच डॉ .मार्टिन हॅरीस असल्याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत.शेवटी तो नाईलाजाने परत फिरतो.
तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो .तिथे एक नर्स त्याला एका व्यक्तीचा अड्रेस देऊन तुला मदत करेल करेल असे सांगते. जुर्गन एक माजी नाझी ऑफिसर मार्टिनला मदत करण्याचे ठरवितो.
एका कॅफेमध्ये जिना त्याला भेटते .पैश्याची लालूच देऊन मार्टिन तिच्या घरी जातो पण तिथे त्यांच्यावर दोन गुंड हल्ला करतात. त्या हल्ल्यातून ते कसेबसे वाचतात आणि जुर्गनला भेटतात.जुर्गनने काही माहिती जमा केलेली असते .
 डॉ. मार्टिन हॅरीस  नक्की कोण आहे ?.त्याला स्वतःची पत्नीच ओळख का दाखवत नाही ?.त्याच्यावर हल्ला करणारे गुंड कोण आहेत ? या कारस्थानामागे नक्की कोण आहेत ? त्यांची योजना यशस्वी होईल का ?
लियाम नेसनची प्रमुख भूमिका असलेला हा वेगवान रहस्यमय चित्रपट नेटफिक्सवर आहे .