Friday, September 27, 2024

रत्नम

Rathnam
रत्नम
तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांच्या  बसवर तीन जणांनी हल्ला केला..त्यातील सर्व प्रवाश्याना लुटून हत्या केली गेली.या प्रकारणाचा शोध घेणाऱ्या पोलीस ऑफिसरचीही हत्या करण्यात आली. 
काही दिवसांनी एक बुरखेधारी स्त्री आपल्या नवजात बालकाला घेऊन गावात शिरली .केळीची पाने सोलायची नोकरी करू लागली . तिच्या मत्यूनंतर आमदार सेलवनने त्याला सांभाळले .हाच मुलगा रत्नम नावाने सेलवनसाठी काम करू लागला.
सेलवन हा भला माणूस होता.जिथे पोलीस काही करू शकत नाही तिथे तो रत्नमच्या मदतीने प्रकरण सोडवत होता.
त्या दिवशी रत्नमला मल्लीगा दिसली.तिला पाहतच रत्नमला धक्का बसला.तो तिच्याशी बोलायला गेला पण अचानक काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला.हा हल्ला का ? कशासाठी याची तिलाही कल्पना नव्हती पण रत्नमने तिला वाचविले इतकेच नव्हे जितके दिवस ती गावात आहे तितके दिवस तिचे रक्षण करायची जबाबदारी ही घेतली.पण गुंड सतत तिच्यावर हल्ला करीत होते.
एका जमिनीच्या संदर्भात काही लोक तिच्या परिवारावर दबाव टाकतात असे तिने रत्नमला सांगितले .रत्नमने माहिती काढली तेव्हा ते लोक राजकारणी आणि बिमा रायडू हा माफिया आहे हे रत्नमला कळले आणि त्याने ती जमीन बिमा रायडूला देण्याचा सल्ला मल्लिगाच्या परिवाराला दिला. 
त्या जागेवर खाजगी हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायचे रायडूच्या मनात आहे.पण मल्लिगा आणि तिच्या परिवाराचा नकार आहे. 
रत्नम मल्लिगाच्या मागे ठामपणे उभा राहून रायडूला आव्हान देतो .आता रक्तपात अटळ आहे. पण रत्नम मल्लिगाचे रक्षण का करतोय ? गावातील पुजाऱ्यांशी रत्नमचा काय संबंध आहे ??
काही वर्षांपूर्वी तिरुपतीच्या भाविकांची लुटून हत्या झाली त्याचा रत्नमच्या आईचा संबंध आहे का ?? 
एक्शन हिरो विशाल रत्नमच्या प्रमुख भूमिकेत आहे म्हणजे चित्रपटात प्रचंड हाणामारी आणि सुसाट अंगावर काटा येणारे पाठलाग आहेत.
मुरली शर्मा रायडूच्या खलनायक भूमिकेत आहे .
ऍक्शन चित्रपट ज्यांना आवडतात त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा .
चित्रपट हिंदी भाषेत जिओ सिनेमावर आहे.

Wednesday, September 25, 2024

रुस्लाम

Ruslaam
रुस्लाम
रुस्लामचे वडील काश्मीरमधील आतंकवादी होते. एटीएस चीफ समीरसिंहने त्यांना एका कारवाईत ठार मारले आणि छोट्या रुस्लामला वाचविले.पुढे त्यांनीच त्याला दत्तक घेऊन लहानाचे मोठे केले. काश्मीर आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यात कासीमचा हात होता.हा कासीम घोस्ट म्हणून ओळखला जात होता.त्याला आतापर्यंत कोणीच पाहिले नव्हते.  
रुस्लाम मोठा होऊन रॉसाठी काम करतोय.पण हे त्याच्या घरच्यांना माहीत नाही .तो म्युझिक टीचर म्हणून मुंबईतील नावाजलेल्या कॉलेजमध्ये काम करतोय.कॉलेजमध्ये जातीयवादी ऍक्टिव्हिटी चालतात त्यावर तो लक्ष ठेवतो. म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एक छोटा स्फोट होतो .रुस्लाम त्यामागे कोण आहे हे शोधून काढतो . 
चायनीज उद्योगपती कासीमची मदत घेऊन मुंबईत एक मोठा दहशतवादी हल्ला करायचा प्लॅन आखतो.तो रुस्लामला यात बळीचा बकरा बनवतो .
पण रुस्लाम हा हल्ला यशस्वी होऊ देईल का ??
कासीम कोण आहे याचा शोध रुस्लाम घेईल का ?? 
आयुष शर्मा रुस्लामच्या भूमिकेत एका दमदार ऍक्शन हिरोच्या भूमिकेत आहे .
ज्यांना  ऍक्शन थ्रिलर चित्रपट आवडतात त्यांनी रुस्लाम जरूर पहावा .
जिओसिनेमावर हिंदी भाषेत आहे.

Sunday, September 22, 2024

मुर्शीद

MURSHID
मुर्शीद
मुर्शीद पठाण मुंबईच्या अंडरवर्डचा माजी डॉन. एके काळी त्याने मुंबईवर राज्य केले होते. पण त्याचा मोठा मुलगा मारला गेला आणि त्याने शस्त्र खाली ठेवले. आपला उजवा हात फरीदच्या हाती कारभार सोपवून निवृत्त झाला .आता तो शांतपणे आपले निवृत्त आयुष्य जगतोय. सर्वाना मदत करतोय. मोठा मुस्लिम समुदाय त्याच्या पाठीशी उभा आहे.
फरीद तालिबानी लोकांकडून ड्रगची डिलिव्हरी घेतो.याकामी तो नवीन तरुण मुलांची निवड करतो.त्या दिवशी ड्रग आणायची पाळी सलीम आणि जुनेदची होती.डिलिव्हरी घेताच सलीमने तालिबानी गुंडांना मारले .जुनेद पळून गेला आणि महेश भाई जो फरीदचा उजवा हात आहे त्याच्याकडे आला .पण डिलिव्हरी आणि पैसे घेऊन सलीम गायब झाला .जुनेदला ड्रग आणि सलीमसाठी खूप मारहाण करण्यात आली .फरीदने जुनेदला पाहिले आणि तो हादरला .जुनेद मुर्शीदचा मुलगा होता.
मुर्शीद चिडला तर तो सगळ्यांना भारी पडेल याची कल्पना फरीदला होती.पण फरीदच्या पाठी मुख्यमंत्री होते.आणि मुख्यमंत्र्यांचा  मुलगा जयेंद्र आता निवडणुकीला उभा राहून भावी मुख्यमंत्री बनणार होता.
मुस्लिम वोटसाठी मुर्शीदला हात लावणे जयेंद्रला परवडणार नव्हते.पण मुर्शीद जिवंत राहिला तर फरीद मरणार  हे निश्चित होते. त्यामुळे फरीद काहीही करून मुर्शीदला मारणार .
मुर्शीद आपल्या मुलाला वाचविण्यासाठी पुन्हा शस्त्र हाती घेऊन या युद्धात उतरेल ?
जयेंद्रला निवडणूक जिंकण्यासाठी कोणाचे बलिदान द्यावे लागेल .??
के .के.मेननने थंड रक्ताच्या मुर्शीद पठाणची मुख्य भूमिका साकारली आहे. झाकीर हुसेनने फरीद बनून त्याला उत्तम साथ दिलीय. राजेश श्रींगारपुरे बऱ्याच काळाने जयेंद्रच्या भूमिकेत दिसलाय.
झी 5 वर ही सिरीज हिंदी भाषेत आहे .

Friday, September 20, 2024

अग्लीस

UGLIES
 अग्लीस
ही कथा आहे भविष्यातील जगाची. नैसर्गिक स्रोत नष्ट झाले आहेत. त्यामुळे आता सर्व रेडिमेड मिळते. सिटी नावाचे जग आहे जे अतिशय सुंदर आहे.पण त्या जगात जाण्यासाठी सोळा वर्ष पूर्ण व्हावी लागतात .त्या आधी त्या मुलांना अग्ली म्हटले जाते.सोळा वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणींवर एक शस्त्रक्रिया केली जाते .त्यामुळे त्यांना आजुबाजूला फक्त आनंद दिसतो. त्यांच्यातील इतर भावना नष्ट होतात.
टॅली आता सोळा वर्षे पूर्ण करणार आहे .ती सिटीमध्ये जाण्यासाठी आतुर आहे.तिने तिच्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग ही निश्चित केलाय.त्या आधी तिचा मित्र पॅरिस सिटीमध्ये गेलाय आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झालीय.
शाय नावाची तरुणी आता टॅलीची मैत्रीण आहे .ती टॅलीला छापील पुस्तक वाचायला देते जे तिच्यासाठी नवीन आहे . मग ती तिला स्मोक या जगाविषयी सांगते .स्मोकमध्ये नातेसंबंध आहेत .तिथे पाणी आहे .लोक शेती करून अन्न पिकवतात .म्हणजेच तिथं नैसर्गिक स्रोत आहेत.पण सिटी  स्मोकला मानीत नाही .ते स्मोकला नष्ट करायला बघत असतात.डॉ.केबल सिटीची प्रमुख आहे .कोणावर शस्त्रक्रिया करायची हे तीच ठरवते.
डेव्हीड स्मोकमध्ये राहतो .तो बहुसंख्य तरुणांना स्मोकमध्ये आणायचा प्रयत्न करतो .शाय स्मोकमध्ये जाते.जाण्यापूर्वी ती टॅलीला स्मोकमध्ये जाण्याचा मार्ग सांगते.
एक अग्ली तरुणी नाहीशी झालीय हे  डॉ.केबलला समजते. ती टॅलीची शस्त्रक्रिया थांबविते आणि शायला स्मोकमधून परत आणायला सांगते .यासाठी पॅरिस डॉ केबलच्या पाठीशी असतो.
टॅलीमार्फत स्मोकचे ठिकाण समजले की सगळ्यांना बंदी बनवून स्मोक नष्ट करायची डॉ केबलची योजना असते.
टॅली शायला परत सिटीमध्ये आणेल का ??
डेविड स्मोकला वाचवू शकेल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान विरुद्ध नैसर्गिक स्रोत यांची लढाई नक्कीच थरारक आहे.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.सहकुटुंबासोबत बघण्यासारखा हा चित्रपट सर्वाना आवडेल 

Thursday, September 19, 2024

द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह

द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
फ्रेडरिक फोरसिथ
अनुवाद ..रमेश जोशी 
राजहंस प्रकाशन 
एका छोट्या चुकीमुळे रशियातील गहू उत्पादनात घट झाली .आता रशियाला आपल्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे साडे पाच कोटी टन गहू कमी पडतोय .मोठया दुष्काळाला रशियाला सामोरे जावे लागणार आहे .ही गोष्ट अमेरिकेच्या फायद्याची ठरणार होती . ते गहू देण्याच्या मोबदल्यात अनेक फायदे आपल्या पदरात पाडून घेणार होते.
त्याचवेळी युक्रेनच्या स्वातंत्र्यची लढाई देखील चालू होती.आंद्रे ड्रेक हा इंग्लंडच्या मर्चंट नेव्हीच्या ऑफिसात काम करणारा साधा तरुण कारकून .पण तो खरा युक्रेनियन स्वातंत्र्यसैनिक होता .आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्याने काही साथीदारांना घेऊन एक भयानक योजना आखली .
त्याच्या योजनेनुसार केबीजी च्या प्रमुखाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पण त्यांच्या दुर्दैवाने रशियाने ही बातमी दडवून ठेवली .नंतर त्याच साथीदारांनी विमान अपहरण केले पण तोही डाव फसला आणि त्यांना अटक झाली .त्यांनीच केबीजी प्रमुखाला मारलंय हे रशियाला ठाऊक होते .त्यांची रवानगी तुरुंगात झाली.
जपानमध्ये  फ्रेया नावाचे एक महाकाय तेलवाहू जहाज बनतय.दहा लाख टन तेल वाहून नेण्याची क्षमता या जहाजात आहे .जगातील हे इतक्या क्षमतेच पहिलंच जहाज आहे .थॉर हा नॉर्वेजियन माणूस जहाजाचा कॅप्टन आहे.
दहा लाख टन क्रूड ऑइल भरून  फ्रेया प्रवासाला निघालीय .पण मध्येच ड्रेक आणि त्याचे साथीदार जहाजाचे अपहरण करतात. जहाजातील तेलाच्या टाक्यांना स्फोटके लावतात. ते तुरुंगात असलेल्या आपल्या साथीदारांची  सुटका करून  त्यांना  इस्त्रायला  पोचविण्याची मागणी करतात .
युरोपातील दहा देशांचे भवितव्य फ्रेयावर अवलंबून आहे.दहा लाख टन क्रूड ऑइल समुद्रात पसरले तर किती हानी होईल याचा विचार कोणीच करू शकत नाही .पण दोन कैद्यांची सुटका झाली आणि त्यांनी केबीजी प्रमुखाची हत्या केली आहे असे जाहीर झाले तर युक्रेनचा  स्वातंत्र्यलढा यशस्वी होईल आणि रशियाची नाचक्की होईल अशी भीती रशियाला आहे .आणि सध्या युक्रेनमध्ये जास्त गहू पिकतो .
शेवटच्या क्षणापर्यंत  चालणारे अपहरणनाट्य आपल्याला खिळवून ठेवते.
डोक्याला चालना देणारी एक थरारक कादंबरी .