Saturday, March 9, 2024

Anweshippin Kandethum

Anweshippin Kandethum
अन्वेशीप्पीन कंडेथुम
सबइंस्पेक्टर आनंद नुकताच त्या छोट्या गावात रुजू झाला आहे.त्याचे काम चांगले आहे .गावात त्याला मान आहे.
पण एक दिवशी गावातील तरुण मुलगी गायब होते आणि तिचा मृतदेह एका नाल्यात सापडतो. त्या प्रकरणाचा शोध घेताना आनंद गावातील एका चर्चपाशी येतो.पण दोन जातीतील वैरामुळे त्याला तिथे चौकशी करता येत नाही उलट जातीय तणाव वाढू नये म्हणून त्याच्याकडून तपास काढून घेतला जातो आणि तपास बंद व्हावा म्हणून खोट्या अपराध्याना पकडले जाते.
आनंद अनधिकृतपणे त्या प्रकरणाचा शोध घेऊन खरा अपराधी पकडतो पण नंतर असे काही घडते की आनंद आणि त्याच्या साथीदारांना निलंबित केले जाते.
सध्या आनंद आणि त्याच्या साथीदारांवर कोणतीही जबाबदारी नाहीय. ते पोलिसांच्या इतर विभागात काम करतायत.
पण एके दिवशी एसपी आनंदला बोलावून घेतो .1988 साली चिरुवेली गावात श्रीदेवी नावाच्या मुलीची हत्या झाली होती .सीबीआय, क्राईम, एसआयटी ने त्या प्रकरणाचा तपास केला होता पण कोणालाच यश आले नव्हते. डिपार्टमेंटला ती केस बंद करायची आहे.आणि त्यासाठी त्यांना एक टीम तिथे पाठवायची आहे.या प्रकरणाला आता सहा वर्षे झालीत.
एसपी आनंद आणि त्याच्या साथीदारांना या प्रकरणाची फाईल देऊन त्याची चौकशी करायला सांगतो.आनंद आणि त्याचे साथीदार चिरुवेली गावात येतात.पण त्यांची माहिती आधीच गावात पोचलेली असते.गावात त्यांना विरोध होतो .तरीही ते चिकाटीने तेथील निवृत्त पोलीस कॉन्स्टेबलची मदत घेऊन या प्रकरणातील खऱ्या खुन्यापर्यंत पोचतात.पण ???
चित्रपटात दोन खुनाचा तपास आहे.दोन्ही प्रकरणात शेवटी अनपेक्षित घटना घडतात ज्याने आनंदच्या कारकीर्दीवर परिणाम होतो.
चित्रपटात हिंसा नाही ,आरडाओरड नाही .शांतपणे चित्रपट पुढे सरकत राहतो पण आपल्याला जागेवरून उठू देत नाही .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment