Monday, April 8, 2024

Beverly Hills Cop (1984 )

Beverly Hills Cop (1984 )
बेवरली हिल्स कॉप
एक्सेल फोलि डेट्रोईट शहराचा तरुण उत्साही धाडसी पोलीस ऑफिसर .आज बर्याच वर्षांनी त्याचा बालपणीचा मित्र मायकेल उर्फ मिकी त्याला अचानक भेटायला आलाय. खरे तर मिकी चोर आहे .तुरुंगात अनेक वर्षे होता . आताही त्याने काही हजाराचे बॉण्ड चोरून आणले आहेत. तो जिथे गार्ड म्हणून काम करतो त्या मालकाचे ते बॉण्ड आहेत असे सांगतो.एक्सेल आणि मिकी रात्री फिरायला बाहेर पडतात आणि नशेत घरी येतात.अचानक दोन व्यक्ती एक्सेलला जखमी करतात आणि मिकीला गोळी घालून ठार करतात.
एक्सेलचा बॉस त्याला ही केस देत नाही म्हणून एक्सेल स्वतः सुट्टी घेऊन या प्रकरणात लक्ष घालायचे ठरवितो.ह्या प्रकरणाची मुळे बेवरली हिल्समध्ये दडलेली आहेत म्हणून एक्सेल तिथे दाखल होतो.
योगायोगाने त्याची आणि मिकीची मैत्रीण तिथल्या आर्ट गॅलरीत कामाला आहे .आणि ती मिकीच्या मालकाला व्हिक्टरला ओळखते.एक्सेल त्याला भेटून मिकीची चौकशी करतो पण व्हिक्टरची माणसे त्याला ऑफिसबाहेर फेकून देतात. पोलीस ही त्याला सहकार्य करीत नाहीत उलट त्याच्या मागावर जॉन आणि बिलीला नेमले जाते.
पण एक्सेल आपल्या अंगभूत गुणाने बिली आणि जॉनला आपल्या बाजूने वळवितो आणि या प्रकरणाच्या मूळाशी कसा पोचतो हे बघण्यासारखे आहे.
एडी मर्फीची बेवरली हिल्स कॉप ही तीन भागाची चित्रपट सिरीज अतिशय गाजलेली आहे. एडी मर्फीने विनोदी ढंगाने यात एक्सेल फोलि साकारला आहे. चित्रपट पाहताना नसिरुद्दीन शहाच्या जलवा चित्रपटाची आठवण येते .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment