Thursday, August 1, 2024

द मिनिस्ट्री ऑफ अनजेंटलमनली वॉरफेयर

The Ministry Of  Ungentlemanly Warfare
द मिनिस्ट्री ऑफ अनजेंटलमनली वॉरफेयर
1941 ला जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू होते.तेव्हा हिटलरचे नाझी सैन्य इंग्लंडला भारी पडत होते.त्यांनी समुद्रातून आणि आकाशातून इंग्लंडला भाजून काढत होते.समुद्री मार्गात जर्मनीच्या यु बोट तैनात होत्या .ते ब्रिटिशांच्या युद्धनौका बुडवून टाकीत होत्या.एक वेळ अशी आली होती की ब्रिटनला हिटलरपुढे शरणागती शिवाय पर्याय नव्हता.संसद पंतप्रधान चर्चिलवर दबाव टाकत होती.
पण चर्चिलने अजून हार मानली नव्हती.समुद्रमार्ग मोकळा झाला तर अमेरिकन सैन्य मदतीला येईल याची त्यांना खात्री होती. जर्मनीच्या यु बोटींना लागणारा प्रचंड दारुगोळा ड्युचेसा या  इटालियन महाकाय जहाजावर होता आणि ते जहाज फर्नांडो पो या तटस्थ बेटावर नांगरले होते.
ड्युचेसाला नष्ट केले तर जर्मनीच्या यू बोटींना दारुगोळा मिळणार नाही त्यामुळे तिला नष्ट करायची ऑर्डर चर्चिलने दिले. या कामासाठी काही खास माणसे निवडली गेली.सध्या त्यातील मुख्य गस मार्च तुरुंगात आहे. हे ऑपरेशन अतिशय गुप्त आणि अनधिकृत आहे. या ऑपरेशनला ऑपरेशन पोस्ट मास्टर नाव दिले. गस मार्चने प्रत्यक्ष कामासाठी आपल्याला हवी ती माणसे निवडली . आंद्रे लासेन अतिशय शक्तिशाली आणि उत्कृष्ट तिरंदाज  आहे. जेफ्रि ऍपल प्लॅनिंगमध्ये हुशार आहे. हेन्री कुशल नेव्हीगेटर आहे.
मरजोरीए स्टीवर्ट  नावाची देखणी स्त्री  आणि  कॅसिनो मालक हेरॉन फर्नांडो पो बेटावर आधीच पोचले आहेत.ते तिथून त्यांना मदत करणार आहे.
आता हे सर्वजण ते जहाज नष्ट करतील का ?? ही बातमी बाहेर फुटली तर चर्चिल यांचे पंतप्रधानपद धोक्यात येणार आहे.यात प्रत्यक्षात भाग घेणारे सैनिक नाहीत. तरीही चर्चिल आणि टीमने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
दुसऱ्या महायुद्धावर अनेक चित्रपट निघाले . त्यातील बरेच काल्पनिक होते. पण काही सत्य घटनेवर आधारित होते.हा चित्रपट ही सत्य घटनेवर आधारित आहे.
 हा थरारक युद्धपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.
जेम्स बॉण्डचा जनक इयान फ्लेमिंगची व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे.त्यांनी ऑपरेशन पोस्टमास्टरमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.

No comments:

Post a Comment