केदारनाथ १७ जून
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे
एलोरा पब्लिकेशन
१७ जून २०१३ साली केदारनाथ येथे महापूर आला .ढगफुटी झाली .संपूर्ण गावे नष्ट झाली. वादळी पावसाने समोर येईल त्याला नष्ट करून टाकले.
हा जीवघेणा प्रवास आहे या महापुरात वाचलेल्या डॉ. सिद्धार्थ या मानसोपचारतज्ञाचा. त्याने जगण्यासाठी केलेली धडपड पाहून अंगावर काटा येतो.
डॉ. सिद्धार्थ पुण्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ .लग्नानंतर बरीच वर्षे त्यांना मूल झाले नाही .शेवटी त्याच्या बायकोने मूल झाले तर तुला एकत्र भेटायला येऊ असा नवस केदारनाथला केला आणि त्यांना मुलगा झाला.
आज ते एकत्र केदारनाथला निघाले.डॉ. सिद्धार्थच्या मित्राने श्रेयसने त्यांची सर्व व्यवस्था केलीय.श्रेयस भारतीय सैन्यात अधिकारी असल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम आहे.श्रेयस ही त्याच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन सिद्धार्थ सोबत आहे.श्रेयसचा मुलगा सहा वर्षाचा असून त्याला ऑटीझम आहे.
केदारनाथला रात्रभर पाऊस पडत होता .मंदाकिनी नदीला पूर आला आणि तिने रौद्र रूप धारण केले. त्यात सिद्धार्थ आणि श्रेयस राहत असलेले हॉटेल ही वाहून गेले.सिद्धार्थ आणि त्याची पत्नी आणि मुलगा एकमेकांच्या मिठीत राहिले आणि वाहून गेले.
जाग आली तेव्हा सिद्धार्थ एका चिखलात अडकून बसला होता.आजूबाजूला फक्त प्रेतच दिसत होती. अचानक सिद्धार्थला त्या चिखलात ओळखीचा चेहरा दिसला .तो श्रेयसच्या सहा वर्षाच्या मुलाचा होता.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा जिवंत होता.
त्याला घेऊन डॉ सिद्धार्थचा स्वतः ला सुरक्षित ठेवण्याचा जीवघेणा प्रवास सुरु होतो.
डॉ. सिद्धार्थ त्या छोट्या मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी जाईल का ? त्यांना वाचवायला कोण येईल का ??
हा प्रवास अतिशय जिवाघेणा आणि अंगावर काटा आणणारा आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे सुंदर केदारनाथ आता फक्त चिखलमय झाले आहे .हजारो प्रेते तेथे कुजत पडली आहेत.दूरवर कुठेही माणूस दिसत नाही .पूर आलाय पण पाणी पिण्यायोग्य नाही.खायला अन्न नाही.अंग झाकायला कपडे नाहीत त्यात जिथे जखमा झाल्यात त्या सडू लागल्या आहेत. डॉ. सिद्धार्थपुढे परिस्थितीला शरण जाण्यावाचून पर्याय नाही .पण त्या मुलासाठी त्याला जिवंत राहायचे आहे .
एक जिवाघेणा प्रवास अनुभवण्यासाठी केदारनाथ १७ जून नक्की वाचा.
No comments:
Post a Comment