भद्रकाली
Bhadrakaali
अभ्यंकर श्रीनिवास राजकारणाततील किंग समजला जातो. त्याला पाठीमागून सर्व सूत्रे हलवायला आवडतात.पण त्याचीही काळी बाजू आहेच.
किट्टू त्याच्याकडे लहानपणापासून कामाला होता.घरातील छोटी मोठी कामे करत मोठा झाला .तो अनाथ आहे .त्याच्या आईने आत्महत्या केली होती अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.
आता किट्टू मोठा होऊन एक एजंट झालाय. जी कामे कोणी करू शकत नाही अशी कामे तो करतो.यात त्याला भरपूर कमिशन मिळते. तो कोणत्याही ऑफिसरची बदली त्यांना पाहिजे त्या ठिकाणी करू शकतो.करोडो रुपयांचे जमिनीचे व्यवहार करतो.कॉलेजमध्ये ऍडमिशन करतो.
केंद्रीय मंत्री लताचा भाऊ मूर्ती किट्टूला जपानचा प्रोजेक्ट होणारी तीनशे एकर जमीन स्वतःच्या नावावर करण्याचे काम देतो . त्याबदल्यात तो दोनशे कोटी कमिशन देण्याचे वचन देतो.
किट्टू एक मोठी योजना बनवतो आणि जमीन मूर्तीच्या नावावर होते.पण ह्यामागे काहीतरी घडलंय असा संशय लताला येतो आणि ती अभ्यंकरला सांगते.
अभ्यंकर या घटनेची चौकशी करतो आणि किट्टूचे नाव समोर येतो.आपला नोकर यामागे आहे हे समजताच अभ्यंकर हादरतो आणि तो हात धुवून किट्टूच्या मागे लागतो. अधिक तपास करताना जवळजवळ सहा हजार कोटींचा घोटाळा किट्टूने केलाय असे निष्पन्न होते .
किट्टू आणि त्याच्या साथीदारांना अटक होते प्रचंड मारहाण होते त्याच्यावर दीडशेपेक्षा जास्त केसेस केल्या जातात. शेवटी नाईलाजाने किट्टू त्यांना पैसे कुठे दडवले आहे ते सांगून स्वतःची आणि साथीदारांची जामीनावर सुटका करून घेतो. त्याची पत्नीही आता गरोदर आहे त्याला तिचीही काळजी आहे.
किट्टूला रोज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागते .त्याचा पूर्ण दिवस त्यातच निघून जातोय. त्याच्यावर पोलिसांची ,अभ्यंकरच्या गुंडांची नजर आहे .आता त्याला काहीच करता येत नाही.
पण आता योग्य वेळ आलीय किट्टूला स्वतःची खेळी करायची .त्याने याची तयारी फार पूर्वीपासूनच केलीय.
किट्टू या सर्वांना कसे उघडे पाडतो हे बघण्यात वेगळीच मजा आहे.
हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे यात कधी किट्टू माघार घेतो तर कधी अभ्यंकर .पण ते पुन्हा एकमेकांवर बाजी पलटविण्याचा प्रयत्न करतात.यात विजय कोणाचा आणि कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
यात हाणामारी ,रक्तपात नाही फक्त चातुर्य आहे ,योजना आहेत ,पैश्याचा खेळ आहे ,राजकारणातील डावपेच आहे.
विजय अँटनी किट्टूच्या प्रमुख भूमिकेत आहे. विजय अँटनीचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्याच्या भूमिकाही वेगळ्याच प्रकारच्या असतात .
No comments:
Post a Comment