फुल ब्लॅक ….ब्रॅड थॉर
अनुवाद ...बाळ भागवत
मेहता पब्लिशिंग हाऊस
गुप्तहेर जगतात अनेक मोहिमा सुरू असतात.काही अति संवेदनशील असतात त्यांचे अस्तित्व कोणीही मान्य करीत नाही इतकेच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यालाही त्याची काहीच कल्पना नसते .त्याच फुल ब्लॅक असतात.
अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाने कार्लटनला खाजगी गुप्तहेर संघटना स्थापन करण्याची मंजुरी दिलीय.एफबीआय आणि सीआयए यांच्यात अंतर्गत वाद चालू आहेत ,लाल फितीचा कारभार भरपूर आहे त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याना खूप त्रास होतोय आणि म्हणूनच ही खाजगी गुप्तहेर संघटना आहे. शोधा, गाठा आणि संपवा हे त्या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. नेव्ही सील 6 चा निवृत्त सैनिक स्कॉट हॉवर्थ त्या संघटनेचा प्रमुख एजंट आहे.
काही संघटना अमेरिकेच्या विनाशावर टपलेल्या आहेत. हॉलिवूड निर्माता एक शॉर्ट फिल्म काढतोय त्यात आर्थिक दहशतवाद हा प्रमुख विषय आहे पण ती फिल्म पूर्ण होण्याच्या आधीच त्यांच्यावर भाडोत्री सैनिकांचा हल्ला होतो .योगायोगाने तो वाचतो आणि मित्रांसोबत परागंदा होतो.
स्कॉट हॉवर्थ उपसालाचा एक दहशतवादी तळ नष्ट करतो त्यातून त्याला अजून काही माहिती मिळते.अमेरिकेत एकाच दिवशी अनेक ठिकाणी हल्ले होणार आहेत.ते हल्ले फक्त एकदाच होणार नसून कधीही कोणत्याही दिवशी होतील आणि प्रत्येक हल्ला वेगवेगळ्या स्वरूपात असेल .
कार्लटन आणि स्कॉटला हे हल्ले थांबवून त्यामागचा प्रमुख शोधून त्याला ठार मारायचे आहे.पण ते इतके सोपे असेल का ?
No comments:
Post a Comment