Friday, March 27, 2026

आय कॅन सी यू

आय कॅन सी यू.... करेन रोझ
अनुवाद.... पराग पोतदार
मेहता पब्लिशिंग हाउस
शॅडोलँड एक  कॉम्प्युटर गेम.या गेममध्ये आभासी दुनिया आहे.त्यात भाग घेणारा स्वतःचा एक कल्पनेतील अवतार किंवा रूप घेऊन खेळू शकतो.इव्ह या गेममधील खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे.ती याविषयावर प्रबंध लिहीत आहे. ती स्वतःही या गेममध्ये आहे.
अचानक या गेममधील तरुणींची हत्या होऊ लागतेय. हे खून एकाच पद्धतीने होतायत. खुनी हुशार आहे .तोही या गेमचा हिस्सा आहे. 
डिटेक्टिव्ह नोआह आणि त्याचा त्याचा साथीदार जॅक या प्रकरणाचा तपास करतायत. इव्ह या तरुणींना वाचविण्याचा प्रयत्न करतेय पण तिच्यावर ही कोणाचेतरी लक्ष आहे.
नोआह आणि जॅकच्या मागेही त्याचे जुने शत्रू लक्ष ठेवून आहेत आणि संधी मिळताच ते त्यांचा काटा काढणार आहेत.
एकूण सहा खून झालेत आणि आता खुन्याचे लक्ष इव्ह आणि नोआह आहे. 
एक धक्कादायक ,उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी कादंबरी.

No comments:

Post a Comment