अलोन
ALONE
कोविडमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले.कोचीही त्याला अपवाद नव्हते.त्याचवेळी कोचीतील स्ट्रॉबेरी नावाच्या उचभ्रू लोकांच्या सोसायटीत काली दासचे आगमन झाले.काली दास हा एकटाच आहे.त्याने 13 A फ्लॅट भाड्याने घेतलाय.
सिक्युरिटी गार्डच्या केबिनमधून फ्लॅटची चावी घेतली.सिक्युरिटीने फोनवरूनच त्याला दरवाज्याबाहेर सर्व गरजेच्या वस्तू मिळतील याची खात्री दिली.
काली दास स्वतःची पूर्ण काळजी घेणारी व्यक्ती आहे.तो एका हातात सॅनिटरायझर स्प्रे आणि तोंडावर मास्क लावूनच फिरतो.
तो फ्लॅटमध्ये प्रवेश करतो .त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू जाग्यावर हजर आहेत.तो त्याच्या मैत्रिणीशी आणि फॅमिली डॉक्टरशीच बोलतो. पण बोलण्यावरून वाटते त्याच्या अनेक ओळखी आहेत.
काही वेळाने त्याला फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे असे वाटते.फ्लॅटमध्ये एक आई आणि तिच्या मुलीचे बोलणे त्याला ऐकू येत असते.कोण आहेत त्या दोघी ?? काली दासला त्या दिसत का नाही ??
काली दास हळू हळू या गोष्टीचा माग घेण्यास सुरुवात करतो आणि एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतो.त्यासाठी तो फक्त फोनवरूनच आपल्या काही मित्रांची मदत घेतो.
पण हा काली दास नक्की कोण आहे ?? आणि तो या फ्लॅटमध्ये का राहायला आलाय ??
शेवट पाहून आपणच चक्रावून जातो.
सुपरस्टार मोहनलाल आणि फक्त मोहनलाल या चित्रपटात एकमेव पात्र आहे.तोच संपूर्ण चित्रपटात वावरतो.बाकीच्या व्यक्तिरेखा फक्त फोनवर आहेत तर काही कोविडमुळे बंद दरवाजाआड बोलतात. सव्वादोन तासांचा हा चित्रपट आपल्याला जाग्यावरून उठू देत नाही.
यापूर्वी सुनील दत्त याने 1964 साली यादे चित्रपटात एकपात्री भूमिका केली होती.त्यानंतर हा चित्रपट असेल.
No comments:
Post a Comment