शासकीय तंत्रनिकेतन ठाणे ,येथून १९९२ ला बाहेर पडलो आणि ज्याने त्याने आपला मार्ग निवडला .तसे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात होताच .आम्ही काहीजण ३ महिन्यातून एकदा भेटायचो .फेसबुक आणि व्हात्स अप मुळे सगळे एकत्र आलो .मग सुरु झाले अमर्यादित chatting .कधीतरी सहल ,स्नेह संमेलन ,अचानक कोणीतरी एक दिवस प्रश्न केला कि मोठी प्रसिद्ध माणसे समाजासाठी काय करतात .तर दुसर्याचा ताबडतोब प्रती प्रश्न अरे xxxx तू काय करतोस समाजासाठी ????झाले सुरु झाले सर्वांचे वाद विवाद आणि ठरले आतापर्यंत समाजाकडून घेतच राहिलो आता वेळ आलीय काहीतरी समाजाला परत देण्याची .मग त्यानिमित्ताने परत एकत्र आलो सगळे आणि एक निर्णय घेतला ,आपल्या कुवतीनुसार शिक्षण क्षेत्रात काहीतरी करू .हीच वेळ आहे सामाजिक ऋण फेडण्याची .आणि एकमेकांच्या विश्वासावर उभी राहिली स्टार्ट गिविंग फौंडेशन .मुलांना शाळेत आणण्यासाठी जे काही योग्य असेल ते उपलब्ध करून त्यांना शिक्षणाची गोडी लावावी हे प्रमुख सूत्र समोर ठेवून कामाला सुरवात केली .आम्हाला माहित आहे कि हे काही मोठे कार्य नाही पण जे काही करू ते एकमेकांच्या विश्वासावर आणि योग्य मार्गाने करू .
Tuesday, July 12, 2016
बंडखोर
मी का येवू नये स्मशानात ??? मी का करू नये माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार ?? वडिलांच्या शवाच्या शेजारी बसून मधूने हे प्रश्न विचारले आणि सगळेच स्तब्ध झाले .वातावरणात एक तणाव निर्माण झाला .अर्थात आम्हाला हे घडणार याची जाणीव होतीच
मधुरा वराडकर आमच्या ग्रुपमधली एक .आई वडिलांची एकुलती एक .सुखवस्तू कुटुंब .पण मुलगा म्हणूनच तिची वाढ झाली .त्यात आमच्यासारख्या टवाळखोर आणि बंडखोर मुलांशी दोस्ती .चांगली शिकली आणि लग्न हि केले .नवरा सारखा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर आणि हि सासर माहेर सांभाळू लागली .एक दिवस पहाटे ३ वाजता वडिलांना अर्धान्वायुचा झटका आला .आणि एकटीने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले .सकाळी विचारले तर म्हणाली तुम्हाला का बायकोच्या मिठीतून उठवू .मी उचलले बापाला आणि घेवून आले .त्यानंतर ६ महिने त्यांची सेवा केली.परवा ते वारले आणि तिने फक्त ५ मिनिटे आक्रोश केला..नातेवायिक आले ,मित्रमंडळी जमा झाली.आणि हिने पदर खोचून सगळी सूत्रे आपल्या हाथी घेतली .मी तिला विचारले लाकडे कि विद्युत दाहिनी तर म्हणाली आता लाकडेच पुढच्या वेळी बघू .मी रागावलो पण तिचा चेहरा पाहून राग निवळला .सत्याला सामोरे जाण्याची ताकद होती तिच्यात .वडिलांचा अखेरचा प्रवास चालू झाला आणि तिने वरील प्रश्न केला .६ महिने मुलगा बनून वडिलांची सेवा केली मग शेवटच्या प्रवासात का डावलले जाते मला ?? एक स्त्री आहे म्हणून ???तिच्या डोळ्यातील निश्चय पाहून आम्ही थरारलो आणि तिच्या पाठीशी उभे राहायचे ठरविले .आमचा बंटी बापाचा विरोध डावलून खांदा द्यायला सरसावला .जुने विरुद्ध नवे असे गट पडले .मधु उचल मडके आणि हो पुढे असे मी म्हणालो .मधु मडके घेवून पुढे निघाली .पुढील सर्व विधी तिनेच केले .
बाहेर टपरीवर चहा पिताना मी तिला विचारले आता १० व्हयला केस काढणार का ?? तर हसत म्हणाली हल्ली नाही काढले तरी चालतात पण थोडे कापीन .शेवटी दारात उभी राहून हाथ हातात घेवून भरल्या कंठाने म्हणाली आज तुमच्या पाठींब्यावर समाजाच्या रीतीरीवाजाविरूढ वागले .पण एक कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान आहे .नाहीतर यापुढे रात्री कधीच सुखाने झोपू शकले नसते .तिचा तो समाधानाने फुललेला चेहरा पहिला आणि खर्या मैत्रीची जाणीव झाली .
Monday, July 11, 2016
हसरे दुःख..भा. द.खेर
अजूनही तो जगातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर म्हणूनच ओळखला जातो.अजूनही त्याचे चित्रपट टीव्हीवर लागले कि आमची पिढी आणि आधीची पिढी सगळी कामे सोडून त्याच्या चित्रपटाचा आनंद घेतात. अर्धा तास का होईना, तो सर्वाना आपली दुःखे विसरायला लावतो.सर्वाना मनमुराद हसवतो आणि जाता जाता मनाला चटका लावूंन जातो.
लोकांना नेहमी त्याच्या चेहऱ्यावरचे बालिशपण, निरागसता दिसते पण त्यामागचे दुःख कोणालाच दिसत नाही. त्याने त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी पडद्यावर विनोदीरूपाने सादर केल्या. त्याच्या बेकरीतून पाव घेऊन पळण्याला लोकांनी हसून हसून दाद दिली पण ह्या पावासाठी त्याने किती संघर्ष केलाय याची जाणीवहि लोकांना नाही.
वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी आईचा गाण्याचा कार्यक्रम बंद होऊ नये म्हणून त्याने रंगमंचावर प्रवेश केला आणि कायमचा जोडला गेला. त्याने जगाचे आधुनिकरण होताना माणुसकी कशी हरवते ते दाखवले, तर एका हुकूमशहामुळे जग दुसऱ्या महायुद्धच्या खाईत कसे लोटले गेले आणि सामान्य माणसाचे किती हाल झाले तेही दाखवले. अंध मुलीवर जीवापाड प्रेम करणारा रस्त्यावरचा गरीब माणूस उभा केला आणि तिला दृष्टी आल्यावर त्याला पाहून तिला बसलेला धक्काहि सहन केला.
होय.... तोच तो महान विनोदवीर "चार्ली चॅप्लिन". आज त्याच्या आयुष्यावरचे भा. द. खेर लिखीत "हसरे दुःख " पुस्तक वाचताना आपण किती खुजे आहोत हे जाणवते.चार्लीचे कष्टमय आणि हलाखीचे बालपण, अविरत कष्ट करणारी आणि मधूनच वेडयाचे झटके येणारी आई,जीवापाड प्रेम करणारा त्याचा सावत्र भाऊ यांच्या पाठिंब्यावर चार्ली उभा राहिला. या गरिबीतही त्याच्या आईने योग्य संस्कार केले, त्याला माणूस म्हणून जगायला शिकवले.
प्रसिद्ध माणसे पुष्कळ आहेत, पण अजरामर माणसे फारच कमी आहेत. आज चार्ली त्याच्या अभिनयामुळे विनोदवीर म्हणून अजरामर झालाय पण त्यामागे त्याच्यावर झालेले संस्कारही फार महत्त्वाचे आहेत. माझ्या मुलाला चार्ली चॅप्लिन कोण हे माहित नव्हते म्हणून त्याचा प्रसिद्ध "द ग्रेट डिटेक्टर" टी व्ही वर चालू झाला तेव्हा मी त्याला माझ्या बाजूला बसवले आणि जमेल तितकी त्याची माहिती त्याला सांगितली. त्याला जमेल तितका चित्रपट पाहायला लावला.आमच्याकडून तरी ह्या महान विनोदवीरासाठी हेच करू शकतो.
होकार
असा कसा फक्त चेहरा पाहून होकार देवू ???? आनंद आईवर खेकसला .तो नुकताच मुली बघण्याचा कार्यक्रम पार पाडून आला होता आणि आई त्याबद्दल विचारीत होती ." अरे मी आणि बाबांनी एकमेकांना पाहूनच पसंद केले होते .तरीही संसार करतोयच ना ?? आईचे नेहमीचे उत्तर .पण आनंदला हे मान्यच नव्हते ,बरेच काही प्रश्न ,काही शंका मनात होत्या त्या आधी clear करून घ्यायच्या होत्या ,मुलीच्याही मनात काही शंका काही प्रश्न असतीलच ना ? ती स्वतःचे घर सोडून आपल्या घरी फक्त आपल्या विश्वासावर येणार मग तिला काही हक्क नाही का आपल्याला प्रश्न विचारायचे हे आनंदचे मत .म्हणूनच त्याला मुलीला भेटायचे होते ,अनुष्का दिसायला देखणी ,साधी ती आपल्या एकत्रित कुटुंबात सामावून जायील ,सांभाळून घेयील ,याची त्याला खात्री होती पण हे त्याला सर्व आधीच स्पष्ट बोलायचे होते ,त्याने बाबांना सांगितले तेव्हा नेहमीप्रमाणे बाबांनी होकार दिला आणि हेच योग्य आहे असे बोलून त्याची पाठराखण हि केली .मग आनंदने फोन करून तारीख पक्की केली .ठरल्याप्रमाणे ती कामावरून थेट आली ,साधा पोशाख ,चेहऱ्यावर फार make up नाही ,नैसर्गिक भाव ,चेहऱ्यावर छानसे हसू आणत तिने विचारले "चला कुठे जावूया ?आनंदने तिला शिवाजी पार्कात आणले आणि कट्ट्यावर बसून भडभडा बोलायला सुरवात केली ,ती शांत पणे ऐकून घेत होती ,दोघांनी एकमेकांच्या मनातले बर्यापैकी बोलून टाकले ,दोघांच्याही मनावरचे ओझे कमी झाले ,एकमेकांना काहीप्रमाणात का होयीना पण समजून घेतले याचे समाधान घेवून निघालो ,उपहारगृहात तिने juice मागवला तसा आनंद थोडा हडबडला ,आतापर्यंत वडा सांबर आणि दोघात एक चहा पिणारा माणूस तो .मुलगी बाहेर चांगले खाणारी दिसते अशी नोंद झाली .शेवटी एक आठवडा विचार करून निर्णय घ्यावा असे ठरले .होकार असेल तर उत्तम पण नकार असेल त्याची करणे देवू नये असेही ठरले .दोन दिवसांनी तिचा होकार आला आणि आनंदच्या आईचा जीव भांड्यात पडला .
सखी
हैप्पी वेलेन्ताई डे ,खरे म्हणजे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे कधीच मी मोजलेच नाही कारण मी नेहमी तुला गृहीत धरत राहतो .पण आपली जेव्हा भांडणे आणि वाद होतात आणि त्यानंतर जो अबोलपणा असतो त्यामध्ये जाणवते माझे तुझ्यावर किती प्रेम आहे .स्वतःचे घर सोडून माझ्याकडे आलीस त्याचवेळी तुझी स्वप्ने ,सुख ,दुख माझी झाली .तुझ्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करणे हा माझ्या आयुष्याचा भाग झाला ,माझे रागावणे ,झिडकारण तू सहन केलेस .माझ्या उनाड ,भटक्या ,बेधुंध आयुष्याला गवसणी घालून योग्य दिशा दाखविण्याचे काम केलेस .हळू हळू का होयीना आपण पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतायत .ती पूर्ण होताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बळ देतोय तो आनंदी चेहरा मनात साठवून ठेवत नव्या उमेदीने पुढे जातोय .हे प्रत्यक्ष तुझ्या समोर बोलू शकत नाही कारण डोळ्यात येणारे अश्रू तुला दाखवायचे नाहीत .thank you to become अ पार्ट ऑफ माय life .love you dear
शोध ....मुरलीधर खैरनार
शोध ...मुरलीधर खैरनार ...१६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली ,त्या लुटलेल्या संपतीचा काही भाग परतीच्या वाटेत गायब झाला .त्या खजिन्याचा शोध २०१७ सालातही चालूच आहे .अत्यंत रहस्यमय आणि रोमांचकारी घटनांनी भरलेली हि कादंबरी आपल्याला डॉन ब्राऊन ह्या लेखकाची आठवण करून देते .पण हि कादंबरी प्रसिद्ध होताच लेखकाचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आणि मराठी वाचक एका गुणी लेखकाला मुकला .ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो .
Sunday, July 10, 2016
डेड मॅन्स फॉली.. अगाथा ख्रिस्ती...... अनुवाद ..मधुकर तोरडमल
डेड मॅन्स फॉली.. अगाथा ख्रिस्ती...... अनुवाद ..मधुकर तोरडमल
"क्वीन ऑफ क्राईम "म्हणून जगप्रसिद्ध असलेली अगाथा ख्रिस्ती हिची अजून एक खून रहस्यकथा ,1956 साली लिहिलेली आणि अजूनही प्रसिद्ध असलेला तिचा आवडता मानसपुत्र हरक्युल पायरो याची हि कथा.केवळ तर्क शास्त्र आधारावर पुरावे शोधत मूळ खुनी शोधायची पद्धत.
एका मोठ्या हवेलीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता .त्यामध्ये खेळ म्हणून खुनाचे नाट्य उभे करण्यात आले आहे .त्यासाठी सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिकेला यासाठी पाचारण करण्यात आले ,पण कुठेतरी त्या लेखिकेला काहीतरी विपरीत घडणार याची जाणीव होते आणि ती पायरोला आमंत्रित करते.तिची अंत:प्रेरणा खरी ठरते आणि खरोखरच खून होतो .आता खरा खुनी शोधायची जबाबदारी पायरो वर आली आहे.
अगाथा ख्रिस्ती बद्दल बोलावे तितके कमीच आहे