Friday, November 15, 2024

Citadel: Honey Bunny

Citadel: Honey Bunny
सिटाडेल : हनी बनी
सीटाडेल ही खाजगी गुप्तहेर एजन्सी आहे जी जगाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बनली आहे.आर्मडा हे एक असे सॉफ्टवेअर आहे ज्यात जगावर कंट्रोल करता येईल.सिटाडेलला हे सॉफ्टवेअर हवे आहे कारण दुसऱ्यांच्या हाती पडले तर जगाचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही .
बाबा हा दुसरी एजन्सी चालवतो.तो सीटाडेलमधून बाहेर पडला आहे आणि आता तो सीटाडेलचा शत्रू आहे.बाबाकडे हनी आणि बनी एजंट म्हणून काम करतात .
साल 1992 हनी आणि बनी चित्रपटात ज्युनियर कलाकार म्हणून काम करतायत. बनीचे हे दुसरे रूप आहे खरे तर तो बाबा चा एजंट आहे. तो हनीला आपल्या जबाबदारीवर एजंट बनवतो. आता सगळे आर्मडाच्या मागे लागलेत. डॉ. रघुकडे आर्मडा आहे.हनी त्याच्याशी जवळीक करते तेव्हा तिला आर्मडा आणि डॉ रघूचे महत्व कळते आणि ती बाबाच्या विरुद्ध जाते.पण ती आता गरोदर आहे .बनीपासून तिला मूल होणार आहे.
हनी आर्मडा घेऊन पळून जाते.
आता 2000 साल चालू आहे.हनीची मुलगी नादिया आता आठ वर्षाची झालीय. हनी आपल्या जीवनात सुखी आहे .पण अचानक तिला बाबा चे एजंट आपल्या पाठीशी आहेत हे कळते.तिकडे बनीलाही हनी जिवंत आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे हे कळते.
आता हनीला नादियाला घेऊन सगळ्यांपासून स्वतः चे संरक्षण करायचे आहे. आता सुरू झालीय शिकार.यात जो यशस्वी होईल तोच जिवंत राहील.
सुरू झालाय एक थरारक पाठलाग.यात प्रचंड गोळीबार आहे.सुसाट पाठलाग आहे.बनी हनीच्या मदतीला पोचेल का ?
समंथा प्रभू ने हनीची भूमिका प्रभावीपणे केली आहे.तिचे ऍक्शन सिन प्रभावी आहेत.तर बनीच्या भूमिकेत वरुण धवनने तिला योग्य साथ दिली आहे.
के के मेनन बाबाच्या भूमिकेत शोभून दिसतो.
प्राईम व्हिडिओवर ही  थरारक थ्रिलर सिरीज  हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment