HACK ..CRIMES ONLINE
हॅक ..क्राईम ऑनलाइन
शक्ती गरीब आहे.तिची आई चार घरी कामे करते. त्यांना गावातून त्यांच्याच घरातून बाहेर काढले होते.शक्ती एका सायबर कॅफेत काम करते. तिथेच ती एका कडून हॅकिंग शिकते. आपल्या आईचा अपमान करणाऱ्या एका श्रीमंत व्यक्तीच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्स्फर करते पण ती पकडली जाते.
एसीपी अविनाश भटनागरला सायबर युनिटसाठी काही बाहेरची माणसे हवीत जी हॅक करू शकतात.मुंबई पोलिसांकडे सायबर क्राईमच्या बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. तो शक्ती आणि अजून दोन जणांना आपल्या टिममध्ये घेतो आणि हळूहळू एकेक केस सोडवितो.
यात सायबर क्राईमच्या वेगवेगळ्या केसेस कश्या होतात आणि त्या कश्या पद्धतीने सोडविल्या जातात याची उत्कंठावर्धक पद्धतीने माहिती मिळते.
यात ऑनलाइन मुलींना फसवून ब्लॅकमेलिंग करणे.डार्क वेबवर ड्रग कशी विक्री होते, तसेच बँकेतून परस्पर पैसे ट्रान्स्फर कसे होतात अश्या विविध केसेस पाहायला मिळतात.
विपुल गुप्ता एसीपी आशुतोष भटनागर तर रिद्धी कुमार शक्तीच्या भूमिकेत आहे.
No comments:
Post a Comment