FIR
एफआयआर
इरफान अहमद केमिकल इंजिनियर गोल्ड मेडलिस्ट .पण त्याच्या धर्मामुळे कुठे नोकरी मिळत नाही. नाईलाजाने तो एका अत्तर बनविणाऱ्या छोट्या लॅबमध्ये काम करतो.त्याची आई पोलीस अधिकारी आहे. त्याची एक मैत्रीण दिल्लीला आहे असे तो सांगतो. लॅबचा मालक पेरूमल आणि त्यांचा मुलगा कार्तिकेयन इरफानला फुल टाइम बिझनेसची ऑफर देतात .तो ती स्वीकारतो आणि त्या निमित्ताने कार्तिकेयनसोबत देशातील अनेक भागात केमिकल खरेदी करण्यासाठी फिरतो.
अबू बक्कर अब्दुल्ला आयसीसचा सर्वात मोठा नेता आहे.तो अनेक देशात मोस्ट वॉन्टेड आहे. पण अजून त्याला कोणीही पाहिले नाही. एनआयएचा एक ऑफिसर अबू बक्कर भारतात आल्याची खबर सिक्युरिटी प्रमुख अजय दिवाणला देतो.
हैद्राबादवरून परत येत असताना इरफानचा फोन एयरपोर्टवर हरवतो . पण त्याचे कोणी ऐकत नाही . तो नाराज होऊन चेन्नईला परततो. पण तिकडे हैद्राबादला एयरपोर्टच्या बाहेर बॉम्बस्फोट होतो आणि तिथे इरफानचा फोन सापडतो. इरफानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जाते. त्याच्यावर अबू बक्कर अब्दुल्ला असण्याचे आरोप केले जातात. त्याच्या आईला निलंबित केले जाते. या धक्क्याने ती आजारी पडते .तरीही त्याला आईला भेटू दिले जात नाही.
नाईलाजाने तो पोलीस कस्टडीतून पळतो आणि आईला भेटायला जातो .त्याला पाहून आई प्राण सोडते. मग तो चिडतो आणि बदला घ्यायचे ठरवितो.
तो पुढे काय करेल.? तो खरोखरच अबू बक्कर अब्दुल्ला आहे का ?
No comments:
Post a Comment