Saturday, November 23, 2024

Kishkindha Kaandam

Kishkindha Kaandam
किष्किंधा कांडम 
गोष्ट तशी सरळ साधी आहे. फॉरेस्ट ऑफिसर अजयचे  आज रजिस्टर  पद्धतीने लग्न आहे.त्याची दुसरी बायको अपर्णा एका आय टी कंपनीत काम करत होती.पण आता ती अजयसोबत त्याच्या जंगलातील गावात राहायला आलीय.
अजयचे वडील एक निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत.थोडे ते तिरसट आहेत.सतत आपल्या खोलीत बसून काहीतरी लिहीत असतात.अजयच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते आणि त्याचा सात वर्षाचा मुलगा चाचू तीन वर्षांपूर्वी हरवला आहे.
गावात निवडणूक जाहीर होते आणि गावात ज्यांच्याकडे पिस्तुल आहेत त्यांनी ती पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी असा आदेश आलाय. अजयच्या वडिलांकडे ही पिस्तुल आहे पण त्यांनी ते अजून जमा केले नाही .त्यांना ते सापडत नाही .पोलीस त्यांची चौकशी करतात पण ते सांगू शकत नाही .खरे तर त्यांना विस्मरणाचा आजार झालाय.हळूहळू तो वाढत चालला आहे.
गावात बरीच माकडे आहेत .ते घरातील वस्तू पळवून नेतात .कदाचित बंदूकही त्यांनीच पळवली असेल असा संशय अपर्णा व्यक्त करते.ती अजयच्या वडिलांना रात्री जंगलात काही पेपर जाळताना पाहते.
शेवटी  काही ऑफिसर जमिनीत पुरलेले एक माकड शोधून काढतात.त्याला गोळी लागलेली असते.ती गोळी अजयच्या वडिलांच्या बंदुकीतील आहे असा पोलिसांना संशय आहे.
अपर्णा हळूहळू  जमेल त्या मार्गाने सत्य शोधून काढायचा प्रयत्न करते पण तिच्यासमोर काही धक्कादायक गोष्टी येतात आणि ती हादरून जाते.
हा चित्रपट संथगतीने पुढे सरकत राहतो पण पुढे काय घडेल याची उत्कंठा वाढवत राहतो.यात खून रक्तपात , हाणामारी ,अजिबात नाही.जंगलाचे सुरेख चित्रीकरण आहे.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment