AGNI
अग्नि
जो आग मे जलते है वो अमर होते है.
मुंबईचा फायरमन महादेव निगडेचे हे वाक्य.
फायरमनला नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. माणसाच्या जीवाचे मूल्य मोजता येत नाही आणि फायरमन असे अनेकांचे जीव वाचवतात.तरीही सिस्टीममध्ये त्यांना फारसे मानाचे स्थान नाही .पोलीस आणि सरकारी खात्यात त्यांना आदर नाही .पण ते आपले काम नेहमीच निष्ठने आणि प्रामाणिकपणे करतात. कुठेही आग लागली किंवा दुर्घटना घडली की हातातील जेवण , समारंभ अर्धवट सोडून ते धावत सुटतात.
परेल फायर स्टेशनचा चीफ विठ्ठलराव धोंडूबा सुर्वे अतिशय धाडसी आणि कुशल ऑफिसर आहे.घरी त्याची पत्नी रुक्मिणी आणि मुलगा आहे.त्याचा मेव्हणा अमर सावंत पोलीस ऑफिसर आहे. लोक त्याला सुपरकॉप म्हणून ओळखतात. विठ्ठलचा मुलगा बापाला फारसा मान देत नाही पण मामाला खूप मानतो.
मुंबईत गेले काही दिवस जुन्या इमारती , हॉटेल, चित्रपटगृहात आगी लागतयात. विठ्ठल आणि त्याची टीम या आगी विझवायचा पूर्ण प्रयत्न करतायत.शेकडो लोकांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत.पण नंतर या दुर्घटनांची चौकशी करताना असे आढळून येते की या आगीमागे एक विशिष्ट पॅटर्न आहे.कोणीतरी या आगी जाणूनबुजून लावल्या आहेत.
विठ्ठल आणि त्याची सहकारी अवनी पुरोहित या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतात आणि हादरवून टाकणारे सत्य समोर येते.
या चित्रपटात तुम्हाला फायरमनच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी दिसतील. रोज अग्नी देवाची पूजा करणारे फायरमन, एकमेकांची भंकस करत टोमणे मारत जेवायला बसणारे फायरमन अलार्म वाजताच जेवण टाकून धावती गाडी पकडतात.गाडी बाहेर पडली की देवापुढे दिवा लावून हात जोडणाऱ्या त्यांच्या बायका तसेच ड्युटीवरून सुखरूप परत घरी आल्यावर त्यांची दुष्ट्र काढणाऱ्या बायका पाहून त्यांच्या भावनांची जाणीव होते.
हा चित्रपट तुम्हाला फायरमनचा खरा चेहरा दाखवितो.
प्रतीक गांधीने विठ्ठलराव सुरेख साकारला आहे.त्याला आगीची मुळीच भीती वाटत नाही.तर रुक्मिणीच्या भूमिकेत सई ताम्हणकरने फिट बसली आहे.दिव्येडू अमर सावंत झालाय . जितेंद्र जोशीने महादेव निगडेची भूमिका केली आहे.
मुंबईत घडणारा हा चित्रपट आहे म्हणून तो मराठमोळा आणि आपला वाटतो .
या चित्रपटात आगीची दृश्ये खूपच छान आहेत.
माझा मुलगा या चित्रपटाच्या vfx टीममध्ये होता याचा खरच आनंद होतो.
No comments:
Post a Comment