RED ONE
रेड वन
असे म्हणतात ख्रिस्तमसच्या आदल्या रात्री सांताक्लोज सर्व लहान मुलांना गिफ्ट देतो.पण एकच सांताक्लोज सर्व जगात एकाच रात्री गिफ्ट कसा देईल हा प्रश्न लहानग्या जॅकला नेहमी पडत असे.
आता जॅक मोठा झालाय .त्याचा मुलगाही शाळेत जातो.जॅक एक उत्कृष्ट हॅकर आहे.पैश्यासाठी तो कोणतेही काम स्वीकारतो.असेच एकदा तो पैसे घेऊन एक साईट हॅक करतो.
पण सांताक्लोज खरोखरच अस्तित्वात आहे.त्याचे स्वतःचे अत्याधुनिक जग आहे.पण त्याची माहिती कोणालाच नाही.तो अजूनही रेनडियरच्या रथातून पृथ्वीवर येतो.ड्रीफ्ट त्याचा अंगरक्षक आणि चीफ सिक्युरिटी प्रमुख आहे.
आताही सांताक्लोजच्या जगात ख्रिस्तमसची जोरदार तयारी चालू आहे. पण जॅकने हॅक केलेल्या साईटमुळे सांताक्लोजच्या ठिकाणची माहिती त्याच्या शत्रूंना कळली आणि त्यांनी सांताक्लोजचे अपहरण केले.
ड्रीफ्ट आणि त्याची माणसे संताक्लोजला शोधायला बाहेर पडतात.सांताक्लोजने मुलांना गिफ्ट दिले नाही तर मुलांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल याची भीती त्यांना आहे.
ड्रीफ्ट आपल्या अत्याधुनिक उपकरणाद्वारे जॅकपर्यंत पोचतो आणि त्याला सोबत घेऊन तो सांताक्लोजच्या शोधात निघतो.त्याचा प्रवास मोठा आणि खतरनाक आहे. तो सांताक्लोजला वेळेआधी शोधेल का ?
सांताक्लोजचे अपहरण कोणी आणि का केलंय ??
या ख्रिस्तमसच्या काळात सहकुटुंब पहावी अशी थोडी विनोदी ,फँटसी आणि ऍक्शन फिल्म प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे .
No comments:
Post a Comment