Department Q
डिपार्टमेंट क्यू
पोलीस ऑफिसर कार्ल मोर्क आणि त्याचा सहकारी एका घरात बाहेर पोलीस कॉन्स्टेबल उभा असलेला पाहून शिरतात. तिथे एक खून झालेला असतो. अचानक एक बुरखेधारी व्यक्ती येऊन त्यांच्यावर गोळीबार करतो. एक गोळी कार्लला लागते. दुसरी त्याच्या सहकार्याला आणि पोलीस कॉन्स्टेबल मारला जातो.
या घटनेला चार महिने उलटून गेलेत.कार्ल आता ठीक आहे .नियमानुसार त्याचे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार चालू आहेत.पण त्याचा सहकारी कमरेखाली पांगळा झालाय.
मेरीट लिंगार्ड एक महत्त्वाकांक्षी तरुण वकील .ती हुशार आहे पण तितकीच फटकळ .आपला मंद भाऊ विलीयमशिवाय ती कोणाशीच जवळीक करत नाही . आपल्या वडिलांना भेटायला ती विलियम सोबत निघाली पण त्या फेरीबोटीतच नाहीशी झालीय.या गोष्टीला चार वर्षे उलटून गेलीय.पोलिसांनी ती केस अनसॉंल्व्ह केसमध्ये टाकली .
पोलीस कमिशनरला एक डिपार्टमेंट सुरू करायची ऑर्डर येते .यात ज्या केसेस निकालात नाही अर्थात अनसॉल्व्ह केसेस पुन्हा ओपन करून त्याचा तपास करायचा आहे .पोलीस कमिशनर त्या डिपार्टमेंटचा ताबा कार्लला देतात.
अक्रम सिरियातून आलाय .तो आयटी इंजिनियर आहे .पण त्याचा स्वभाव गूढ आहे.त्याला नोकरीची गरज आहे म्हणून कार्लच्या सोबतीला दिले जाते.
रोज डेस्क जॉब करणारी पोलीस ऑफिसर .ती थोडी मनाने खचलेली आहे .कार्ल तिलाही सोबत घेतो.
मेरिट लिंगार्ड ही त्याची पहिली केस आहे.त्या प्रकरणाचे काहीच पुरावे त्यांच्याकडे नाहीत.ती जिवंत आहे का ? तेही माहीत नाही .
होय ,मेरिट लिंगार्ड जिवंत आहे .पण ती कोठे आहे ? कशी आहे हे कोणालाच माहीत नाही .
डिपार्टमेंट क्यू मेरिट लिंगार्डला शोधून कढेल का ?
एक थरारक आणि उत्कंठावर्धक तपास कार्य ज्यात तुम्ही तहानभूक विसरून सामील व्हाल .
No comments:
Post a Comment