KANKHAJURA
कानखजुरा
कानखजुरा एक विषारी किडा आहे ज्याला शेकडो पाय असतात.
आशू , मॅक्सचा लहान भाऊ . त्यांचे पेड्रो आणि शार्दूल हे दोन मित्र. लहानपणी ते सर्व एकत्र खेळायचे .आशू बोलताना अडखळायचा तेव्हा दोघे त्याला तोतऱ्या म्हणून चिडवायचे. आशू मॅक्ससाठी काहीही करू शकतो. त्याने त्याच्यासाठी एका पर्यटकाचा खूनही केलाय आणि तुरुंगात गेला.
आज चौदा वर्षानंतर आशू तुरुंगातून सुटून आलाय .मॅक्स, पेड्रो, शार्दूल गोव्यात बिल्डर झालेत एका झोपडपट्टीचा विकास करून तिथे श्रीमंत लोकांसाठी बंगले बांधायची त्यांची योजना आहे.
मॅक्स आशूला घरी घेऊन येतो पण आपल्या कामात ढवळाढवळ करू देत नाही .शार्दूल आणि पेड्रो आशूला मूर्ख बावळट समजत आहेत .पण आशूच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहेत हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही .
आशू आपल्या बावळट देहबोली आणि तोतरेपणावर सर्वांचा विश्वास जिंकून हळूहळू सगळ्यांमध्ये फूट कशी पाडतो हे बघण्यासारखे आहे .
एकमेकांविरुद्ध कान भरून फूट पाडणे हे आशूचे हुकमी अस्त्र आहे .तो समोरच्याला बोलताबोलता असा काही गुंडाळतो की तो आशुवर पटकन विश्वास ठेवतो .वेळप्रसंगी आशू स्वतः जाणून बुजून मार खातो .
ही सिरीज सोनी लिव्हवर हिंदी भाषेत आहे .
No comments:
Post a Comment