Stolen
स्टोलन
रमण बन्सलची फ्लाईट चुकली म्हणून तो ट्रेनने यायचे ठरवितो .पठाणकोट रेल्वे स्टेशनला तो उतरणार असतो.मध्यरात्री येणारी ट्रेन थोडी लेटच आहे .त्याचा भाऊ गौतम बन्सल स्टेशनला घ्यायला आलाय .दुसऱ्या दिवशी दिल्लीतील एका हॉटेल मध्ये त्यांचा घरगुती कार्यक्रम आहे .
झुम्पा मुंबईहून तान्ह्या बाळाला घेऊन आलीय . रात्र खूप झालीय म्हणून स्टेशनवर झोपली .पण तिचे बाळ कोणीतरी पळविले.त्या बाळाचे टोपरे रमणच्या हातात मिळाले म्हणून रमणवर आरोप केला .पोलिसांनीही रमणवर संशयित म्हणून पाहिले. पण रमणने एका बाईचे वर्णन केले .कदाचित तिनेच ते बाळ पळविले असावे.
गौतम त्या भानगडीतून स्वतःची आणि रमणची सुटका करू पाहतोय पण पोलीस त्यांना सोडत नाही .झुम्पाची दया येउन रमण तिला त्या बाईला शोधायला आपल्या सोबत घेतो .
झुम्पा ,रमण आणि चिडलेला गौतम त्या बाईच्या शोधात निघतात आणि सुरू होतो एक थरारक प्रवास .ह्या प्रवासाची गौतम झुम्पा आणि रमणने कल्पना ही केली नव्हती .
आता त्यांना बाळाचा शोध नंतर आधी स्वतःचा जीव वाचवायचा आहे .
कोण आहे या सर्वांच्या मागे ??
त्या स्टेशनवरून आधीही तान्ही बाळे चोरीला गेलीत.
एका गैरसमजातून सुरू झालेले हे अपहरण नाट्य एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचते.
अभिजित बॅनर्जी सारखा तगडा अभिनेता गौतमच्या प्रमुख भूमिकेत आहे. शुभम वर्धन रमण आणि मीया मएलझेर झुम्पाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपट ह्या तीन प्रमुख पात्रांभोवती मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत फिरतो.
No comments:
Post a Comment