FLIGHT RISK
फ्लाईट रिस्क
यूएस मार्शल माडोलीन हॅरिश अचानक हल्ला करून विन्स्टनला पकडते . विन्स्टन एका माफियाचा अकौंटंट आहे. त्याला त्याच्या बॉस विरुद्ध साक्ष देण्यासाठी पकडले आहे. आता ती एका खाजगी विमानातून विन्स्टनला तुरुंगात नेतेय. ते खाजगी विमान अतिशय छोटे आणि जुनाट आहे. मोजून तीनच सीट त्यात आहेत.त्यात एक पायलट डॅरिल बूथची आहे.विमानाची यंत्रणा नीट काम करत नाही पण डॅरिल बूथ विनोदी स्वभावाचा आहे .तो सर्व काही ठीक आहे आपण सुखरूप प्रवास करणार असेच सांगतो .
विमान उड्डाण घेते आणि जीपीएस यंत्रणा बंद पडते. अचानक पायलट बूथचा स्वर खुनशी होतो. नंतर हॅरिशला कळते तो खरा पायलट नसून एक प्रोफेशनल हत्यारा आहे .त्याला विन्स्टनला मारण्याची सुपारी दिलीय. मग सुरू होतो चालू हवेत उडणाऱ्या विमानातील थरार .
विन्स्टनला सुखरूपपणे तुरुंगात न्यायची जबाबदारी हॅरिशची आहे .तिला विमानही कट्रोल करायचे आहे .बूथचा सामना करायचा आहे आणि विन्स्टनलाही वाचवायचे आहे .
तीन पात्रात हवेत घडणार थरार आपल्याला नक्की आवडेल .
No comments:
Post a Comment