The Climbers
द क्लिंबर्स
एव्हरेस्टवर चढाई करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आहे. जगातील सर्वात मोठ्या शिखरावर पोचून आपल्या देशाचे नाव उंचावणे ही इच्छा प्रत्येकाची असते.आजही अत्यानुधिक उपकरणांच्या काळातही एव्हरेस्टवर पोचणे सर्वात खडतर आणि कठीण समजले जाते. तर मग 1960 साली काय परिस्थिती असेल ?
चीनच्या गिर्यारोहकांची एक तुकडी एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने चालू लागली . जसजसे शिखर जवळ येत होते तसतसे वातावरण बदलू लागले .अचानक निसर्गाचे रूप बदलले एक जीवघेणे वादळ त्यांच्या दिशेने येऊ लागले. या वादळात ग्रुप कॅप्टन मरण पावला तर फोटोग्राफरला वाचवताना कॅमेरा खोल दरीत पडला. शेवटी फॅन ऊझु ,फोटोग्राफर क्यू सोंगीन आणि एक सहकारी एव्हरेस्टवर पोचले. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता.आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संघटनेने चीनचा दावा फेटाळला आणि त्यांची नाचक्की झाली.
1971 साली पुन्हा एकदा चीनने नवीन तुकडी एव्हरेस्टवर पाठविण्याचा निर्णय घेतला. आता फांग ऊझो एका बॉयलर हाऊसमध्ये काम करतोय .त्याला पुन्हा टीम लीडरची जबाबदारी देण्यात आलीय.चीन सरकारचा या मोहिमेला पूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी फांग ऊझु आणि त्याची टीम एव्हरेस्टवर पोचतील का ?
एक श्वास रोखून ठेवणारा अनुभव घ्यायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर नक्की पहा.
एव्हरेस्टवर चढाईचे ,मध्येच येणारे जीवघेणे वादळ ,त्याला सामोरी जाणारी गिर्यारोहकांची टीम, याचे अप्रतिम चित्रीकरण यात आहे.
ज्यांना थ्रिलर चित्रपट आवडत असेल त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा.
No comments:
Post a Comment