Kalamkaval
कलांकवल
इंस्पेक्टर जयकृष्णन एका केसवर काम करताना त्याला त्यासंबंधित काही अनपेक्षित गोष्टी कळतात. केरळ आणि तामिळनाडू राज्यात काही स्त्रिया बेपत्ता झाल्या आहेत.या सर्व स्त्रिया विधवा, घटस्फोटीत आणि बिनलग्नाच्या वयाने मोठ्या स्त्रिया आहेत. यासर्व घरातून स्वखुशीने बाहेर पडल्या होत्या असे प्रथमदर्शनी दिसून येते.जयकृष्णन हुशार अधिकारी आहे त्याला बाझ या टोपणनावाने ओळखले जाते.
या बेपत्ता असलेल्या सर्व स्त्रियांचा खून झालाय हे त्याच्या लक्षात येते . तो या प्रकरणाचा तपास सुरू करतो.
खरे तर यात खुनी कोण हे आपल्याला सुरवातीलाच कळते. तो खून कसे करतो हेही आपल्याला दिसते पण तो कोण आहे हे कळताच आपण हादरून जातो.
इन्स्पेक्टर स्टॅनली दास तामिळनाडू पोलीस क्राईम ब्रँचला आहे.त्याला या प्रकरणाची बऱ्यापैकी माहीती आहे म्हणून जयकृष्ण त्याला सोबतीला घेतो .
केरळमधून बेपत्ता झालेल्या स्त्रिया तामिळनाडूमध्ये असल्याचे पुरावे सापडतात तर तामिळनाडूमधील स्त्रिया केरळमध्ये असल्याचा संशय असतो.
एक श्वास रोखून धरणारा खुनी आणि पोलीसांचा उंदीर मांजराचा खेळ अतिशय रोमांचक होत जातो.
सोनी लिव्हवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहेत.
इन्स्पेक्टर स्टॅनली दासच्या अफलातून भूमिकेत मामूटी आहे तर त्याच्या विरोधी शांत पण अचूक खेळ खेळणारा जयकृष्णन विनायकनने रंगविला आहे.
खरे तर याविषयावर एक वेब सिरीज आणि एक साऊथ चित्रपट ही आलेला आहे पण त्यामुळे पुढे काय होणार हे बघणाऱ्याला कळते.
No comments:
Post a Comment