द ट्रॅप
लिसा कोराड ही एक प्रसिद्ध लेखिका असून तिच्या अनेक पुस्तकांना बक्षिसे मिळाली आहेत. पण गेल्या दहा वर्षांपासून ती एकांतवासात राहत आहे. तिच्यासोबत एक कुत्रा राहतो, घरात काही वेळासाठी एक मोलकरीण येते, आठवड्यातून एकदा एक डॉक्टर येते आणि कधीकधी तिचा प्रकाशक तिला भेटायला येतो. तिने गेल्या दहा वर्षांत घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. अर्थात, यामागे एक कारण आहे. दहा वर्षांपूर्वी तिची बहीण तिच्यासमोरच खून झाली होती. तिने पोलिसांना ही गोष्ट सांगितली होती, पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट तिलाच मानसिक रुग्ण ठरवण्यात आले.
आज अचानक बातम्या पाहत असताना तिला त्याचा चेहरा दिसला. तो तोच होता, पण आता तो एका प्रसिद्ध वाहिनीवर स्टार पत्रकार बनला होता. त्याचे नाव रॉबर्ट बेंझेन होते.
तिने त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी तिचीच मुलाखत घेण्याची त्याने निवड केली.
रॉबर्ट तिला ओळखत नव्हता. सवयीनुसार त्याने तिची संपूर्ण माहिती गोळा केली. अर्थात, तीही काही कमी हुशार नव्हती; तिनेही आत्मरक्षणाची संपूर्ण तयारी केली आणि त्याला अडकवण्यासाठी एक सापळा रचला.
अखेर मुलाखतीचा दिवस उजाडला. दोघेही समोरासमोर बसले आणि सुरू झाला एक भयानक खेळ!
यात कोण जिंकेल? खरोखरच रॉबर्टने खून केलाय की पोलिसांच्या म्हणण्यानुसार लिसानेच आपल्या बहिणीचा खून केलाय?
सत्य काय आहे, हे रॉबर्टला माहीत आहे का?
No comments:
Post a Comment