लस्ट फॉर लालबाग ....विश्वास पाटील
हाडाचा मुंबईकर आपला वाईट भूतकाळ नेहमी विसरायचं प्रयत्न करीत पुढे जात असतो . त्यातील एक मोठा भूतकाळ म्हणजे गिरणी कामगार संप . ह्या संपाने खूप काही शिकवले .काहीजणांची आयुष्य घडली तर बऱ्याच जणांची आयुष्य मातीत मिळाली . दोन पिढ्यांनी या संपाचे चटके सोसले . मुंबईला खूप काही ह्या संपाने दिले त्यात एक महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी . आजही संपाचा विषय काढला कि अंगावर काटा येतो आमच्या . या संपात कोणाची चूक कोण बरोबर हे महत्वाचे नाही पण संपाची झळ बसली ती सामान्य कामगारालाच.आयुष्य होत्याचे नव्हते झाले ,स्वप्न धुळीला मिळाली असा हा संप . आजच्या पिढीला हे सर्व माहित नसेल आणि आता त्याबद्दल बोलायची कोणाची इच्छा हि नाही . पण विश्वास पाटीलानी हा संपूर्ण इतिहास परत आपल्यासमोर मांडला आहे . नव्यापिढीला यातून नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि आमच्या पिढीचे बरेसचे गैरसमज दूर होतील .अतिशय मेहनतीने आणि संपूर्ण अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक आपल्याला जुन्या लालबाग परळ मधल्या चाळीत घेऊन जाते . ह्या पुस्तकाबद्दल श्री .विश्वास पाटील यांचे अभिनंदन आणि मनापासून आभार .
Monday, December 19, 2016
लस्ट फॉर लालबाग ....विश्वास पाटील
Wednesday, December 14, 2016
माफिया क्वीन्स ऑफ मुंबई.. एस. हुसेन झैदी आणि जेन बोजर्स अनुवाद ..उल्का राऊत
माफिया क्वीन्स ऑफ मुंबई.. एस. हुसेन झैदी आणि जेन बोजर्स
अनुवाद ..उल्का राऊत
आतापर्यंत आपल्याला मुंबईच्या अंडरवर्डमधील माफिया माहित आहेत. पण या दुनियेत माफिया राण्याहि होत्या याची कितपत आणि कितीजणांना माहिती आहे . या सर्व राण्यांची रंजक माहिती यापुस्तकात आहे .हाजी मस्तान, कारीमलाला, दाऊद याना एकत्र आणणारी जेनाबाई दारूचा बेकायदा धंदा करणारी ,पोलिसांची खबरी ,दाऊद ची मानलेली आई ,तर मस्तानची मानलेली बहीण ,आणि स्वातंत्रलढ्यात भाग घेतलेली जेनाबाई अशी तिची अनेक रूपे ,तर दुसरी कामठीपुऱ्यातली साम्राज्ञी गंगुबाई ,आपल्या प्रियकराचा खून केला म्हणून दाऊदच्या मागे हाथ धुवून लागणारी सपना उर्फ अशरफ ,सायन कोळीवाडा येथे मादक पदार्थांचा व्यवसाय करणारी महालक्ष्मी ,तसेच अरुण गवळीची पत्नी ,छोटा राजनची पत्नी ,नीता नाईक,तसेच अबू सालेमची पत्नी मोनिका बेदी या सर्वांच्या कहाण्या यात आहेत .मुंबईच्या गुन्हेगारीजगात या स्त्रियांचे एक वेगळेच स्थान आहेत . विशाल भारद्वाज यांची प्रस्तावना असलेले हे पुस्तक आपल्याला मुंबईतील काळ्या जगाची अनोखी सफर घडवून आणते .
Sunday, December 11, 2016
टेन मॅन आर्मी इन पी. ओ. के.... सुनिल वि. जावळ
टेन मॅन आर्मी इन पी. ओ. के.... सुनिल वि. जावळे
हातात पेन आले आणि दहशदवादाचा विषय असला कि कसेही लिहावे आणि प्रसिद्ध करावे याचे उदाहरण म्हणजे हे पुस्तक . एका 25 वर्षीय तरुण मुलीला नायिका बनवून तिच्या हाथी 9 ब्लॅक कॅट कमांडो देऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोवळे दहशदवादी बनवून प्रशिक्षणासाठी शिरकाव करायचा आणि त्यांचे तळ नष्ट करायचे अशी हि योजना . पण त्यामध्ये नाविन्य काहीच नाही . पाकिस्तानी अधिकारी ,ISIवाले कमांडोना ओळखू शकत नाही . नायिका तर एकदम सुपेरवूमन आहे .जिथे जाईल तिथे सर्व तिच्यावर फिदा होऊन विस्वास ठेवतात ,ती डायरेक्ट पंतप्रधानांशी बोलू शकते ,आपल्या योजना सहज कोणाच्याही गळ्यात उतरवू शकते . पाकिस्तानी अधिकारी डोळे झाकून तिच्यावर विस्वास ठेवतात .अरे इतके सगळे मूर्ख आहेत का?? आणि हि अतिशय शहाणी ,स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व घडवून आणते . शेवटी हे वाचन कधी एकदा संपते असे होते.
Saturday, December 10, 2016
गुरुवारची संध्याकाळ
गुरुवारची संध्याकाळ .... नुकताच 2 रा कप चहा झाला होता आणि विक्रम आत शिरला ."चल बे बोलत त्याने हातच धरला ."अरे विक्रम आज गुरुवार आहे ,आज नको "मनातून खुश होत मी वरवरचे बोललो "च्यायला तात्या ,ढोसायला नाही . गाय शोधायला जायचे आहे . आमच्या हिची ऑर्डर आहे गाय शोधून या ,पान ठेवायचे आहे तिला ." मनातून खट्टू होत मी वरवर हसलो. पण आता नकार देण्याचा प्रश्नच नव्हता . "चल ,म्हणत त्याच्या बाईकच्या मागे बसलो . "अरे इथे असतात ,त्या देवळाजवळ बघू", असे बोलत अर्धा तास गाय शोधत बसलो . शेवटी एके ठिकाणी सापडली. पण हायरे दैवा!!! तिथेही भलीमोठी बायकांची रांग होती . "विकी, अरे वहिनीचा नंबर बहुतेक उद्याच लागेल "असे म्हणून हसू लागलो . गर्दी बघून विक्रम हि भडकला होता ."आता रे, "हताश होऊन त्याने मलाच विचारले . मी हि गमतीने बोललो " गायीच्या मालकीणबाईची धमाल आहे ,तिची पिशवी बघ कशी भरलीय खाऊ ने" ." ते जाऊदे काय करायचे ते बोल ,एकतर आधीच गायी सापडत नाहीत आणि अश्यावेळी त्यांना डिमांड येतो . म्हटले "तुला राग येत नसेल तर माझे ऐकशील तर हो म्हणाला " मी म्हटले चल घरी जाऊ तुझ्या . घरी आलो आणि वहिनीला म्हटले बाजूला ठेवा ते ताट आणि 20/25 जणांना पुरेल इतका चहा बनवा गरम गरम आणि 10 मारी बिस्किटचे पुडे घ्या . वहिनी अचंबित झाली तेव्हा तिला विक्रमने सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि आवाज चढवून बोलला", गप!" तो काय सांगतो ते ऐक "तिने चुपचाप चहा बनवून आणला आणि आम्ही परत तिघे बाहेर पडलो . नाक्यावरच्या गार्डनमध्ये गेलो तेव्हा तिथे 10/15 मुले अभ्यास करीत होते .विभागातील वेगवेगळ्या भागातून आणि घरात पुरेशी जागा नाही ,क्लासला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून इथे बसून विविध क्षेत्रात शिक्षण घेणारी हि मुले .बाहेर नुसत्या रिकाम्या भीक मागणाऱ्या भिकार्याना सर्व काही मिळते पण याना साधा चहादेखील कोण विचारात नाही.आम्ही सर्वाना जवळ बोलवून प्रेमाने चहा आणि बिस्किटे दिली. सर्व मुले खुश झाली "काका योग्य वेळी आलात हो ,अभ्यास करून करून कंटाळा आला होता ,झोपही येत होती ,पण या चहा बिस्किटामुळे कंटाळा पळून गेला आणि परत उत्साह आला " खरेच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही " त्यातील एका मुलाने हाथ जोडून म्हटले . आणि वाहिनीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली.कधी नव्हे ते विक्रम हि भारावून गेला . त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मलाही आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटला.
Wednesday, December 7, 2016
सॉवरे रंग राची ... सोमनाथ केसकर
सॉवरे रंग राची ... सोमनाथ केसकर
सर्वप्रथम माझा मित्र श्री. सोमनाथ केसकर याचे ह्या कादंबरीबद्दल अभिनंदन. आजच्या तरुणपिढीला मीराबाईबद्दल फारशी काही माहिती नाही .श्रीकृष्णाच्या भक्तीत वाहून गेलेली मीरा आणि तिची भजने याची माहिती लोकांना आहे पण तिचा इतिहास तिचे पूर्वज आणि तिचा परिवार याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही .मीराबाईनीं प्रचंड छळ सोसला . पण श्रीकृष्णावरची आपली भक्ती कधीही ढळू दिली नाही . माझ्यासारख्या सामान्य वाचकालाहि खिळवून टाकेल अश्या सहज सोप्या भाषेत लेखकाने हि कादंबरी लिहिली आहे .
Sunday, December 4, 2016
द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो.... आलेक्झांन्डर द्युमास .. अनुवाद .. प्रणव सखदेव
द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो.... आलेक्झांन्डर द्युमास .. अनुवाद .. प्रणव सखदेव
एडमंड डान्टे ,जहाजावरील एक तरुण खलाशी ,आपल्या हुशार आणि धाडसी स्वभावामुळे लवकरच कॅप्टन बनणार असतो . पण जहाजावरील त्याचे शत्रू आणि त्याच्या प्रेयसीवर एकतर्फी प्रेम करणारा एक तरुण त्याचे शत्रू बनतात आणि साखरपुड्या दिवशीच त्याची रवानगी तुरुंगात होते . त्याला देशद्रोही ठरविले जाते . तुरुंगात त्याला एक गुरू भेटतो आणि त्याला खजिन्याचा पत्ता देतो . चौदा वर्षानंतर मोठ्या चातुर्याने डान्टे त्या तुरूंगातून आपली सुटका करून घेतो आणि तो खजिना ताब्यात घेतो . आता फक्त त्याला आपल्याला फसविणाऱ्या शत्रूंचा सूड घ्यायचाय आणि त्यासाठी तो सज्ज झालाय .
नेपोलियनच्या राजकीय पार्श्वभूमीवर घडणारी हि कादंबरी जगातील एक थरारक सहसकथा म्हणून ओळखली जाते .
Thursday, December 1, 2016
मनीचे लग्न
बंड्याच्या घरातून भांडी पडायचे आवाज येऊ लागले तसा मी सावरून बसलो. कारण वादाला सुरवात झाली होती आणि थोड्यावेळाने मला आमंत्रण येणार होते . हा जुना अनुभव होता माझा .त्याच्या आईला काही सुचले नाही कि भांडी खाली पडतात . मी तयारीतच बसलो. अपेक्षेप्रमाणे वहिनी आल्याच " भाऊ ,चला ,आवरा त्या दोघांना ". मी निमूटपणे निघालो.
घरात शिरताच बंड्या म्हणाला " भाऊ बाबाना समजावा ,ह्या नोटबंदीच्या काळात ते मनीचे लग्न कसे होईल याची काळजी करतायत ." मनी उर्फ मनीषा कोपर्यात गरीब गाईसारखी अंग चोरून बसली होती . अतिशय शांत मुलगी ,कधीच स्वतःची मत व्यक्त करत नव्हती . बाबा आणि भाऊ म्हणतील ते मुकाट ऐकत होती . " आहो एकुलती एक मुलगी ,मग लग्न थाटामाटात नको का करायला ,सगळे नातेवाईक ,मित्रपरिवार येणार त्यांचे आदरातिथ्य नको का करायला ?". बाबा म्हणाले तसा बंड्या परत उसळला "आदरतिथ्यची नक्की व्याख्या काय आहे तुमची? ,त्यांना पोटभर खाऊ पिऊ घातले आणि फोटो काढले म्हणजे झाले का ?? मी तर म्हणतो पत्रिकेवर सरळ मनीचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड छापा ,भांडी आणि भेटवस्तू नको असे सांगा ,त्यामुळे स्टेजवर येणाऱ्यांची गर्दी कमी होईल . सगळं आहेर मनीच्या अकाउंट मध्ये जमा होईल . त्यांची भविष्याची सोय होईल ,तो पैसे त्यांना त्यांच्या संसारासाठी वापरता येईल ,आणि सगळा पांढरा पैसा ,काळ्या पैशाचा प्रश्नच येत नाही . देणार्यांनाही प्रॉब्लेम नाही ,सगळ्यांना पुरावे मिळतील . राहिला फोटो काढायचा आणि स्टेज वर गर्दी करायचा प्रश्न तर नवरा बायकोला खाली पाहुण्यात फिरू द्या ,ते तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्ही त्यांना भेटा ,तेव्हाच त्यांचे फोटो काढा ,म्हणजे पाहुणे खुश होतील . आणि हो जेवणात पंधरा वेगवेगळे पदार्थ ठेवण्यापेक्षा मोजकेच पदार्थ ठेवा म्हणजे जेवणही फुकट जाणार नाही . लोकांकडे निवडीचा पर्याय राहणार नाही ,दोन काउंटर जास्त ठेवू त्यामुळे गर्दी हि होणार नाही . उलट येणाऱ्या नव वधूवराना पाहुणे प्रेमाने भरवतील त्यातत त्यांचे पोट भरेल आणि शेवटी नवराबायकोचे संग्रसंगीत जेवण असते तेही वाचेल शिवाय वेटरला जी सेवा न करण्याची भरमसाठ बक्षिसी द्यावी लागते ती हि वाचेल . "अरे बापरे ,बंड्याचे हे क्रांतिकारी विचार ऐकून मी हड्बडलोच. मग बाबाना किती धक्का बसला असेल ?? कुठेतरी मनातून हे पटत हि होते पण भारतीय संस्कृती आणि समाजाशी द्रोह हा विचार मनात शिरू देत नव्हता . माझ्या गप्प बसण्याचा बंड्याने त्याला पाहिजे तसा अर्थ घेतला आणि जोरात बाबाना म्हणाला " बघा बघा ,भाऊंना हि पटतंय . बाबानी हताश होऊन माझ्याकडे पहिले . मी नजरेनेच त्यांना धीर दिला . म्हटले ," बंड्या परिस्थिती अजून इतकीही वाईट आली नाही ,लग्नाला अजून खूप दिवस आहेत आणि समोरच्या मंडळींचा हि विचार करायला नको का ? त्यांना हि विचार करायला वेळ दे" शेवटी लग्न हे दोन्ही बाजूच्या संमतीने झाले पाहिजे . कदाचित तुझ्या काही गोष्टी पटतील त्यांना तसेच त्यांच्याही काही गोष्टी तुम्ही मान्य केल्या पाहिजेत . का उगाच आतापासूनच भांडायला सुरवात करतायत . तू संध्याकाळी घरी ये आपण नीट चर्चा करू " असे बोलून विषय संपवला आणि संध्याकाळच्या चर्चेची मनात तयारी करत घरी परतलो.