बोगद्यातला वाघ आणि इतर पाच कथा ....रस्किन बॉड अनुवाद ..रमा हर्डीकर सखदेव
लेखकाची सगळी जडणघडण झाली भारतात आणि तेही उत्तरेत डेहराडून सारख्या प्रदेशात त्यामुळे निसर्गाचे खरेखुरे रौद्र रूप आणि तेव्हढेच सुंदर रूप त्यांनी अनुभवले आहे . त्यांनी सगळ्यांप्रकारच्या कथा हाताळल्या.त्यातीलच निवडक कथांचा हा संग्रह .या संग्रहातील प्रत्येक कथेत आपण गुंतत जातो .जणूकाही आपण त्या कथेचाच हिस्सा बनून जातो .
Thursday, February 16, 2017
बोगद्यातला वाघ आणि इतर पाच कथा
Tuesday, February 14, 2017
परमिशन
5 चे ठोके झाले तसे आम्ही आवरले आणि निघायच्या तयारीला लागलो .इतक्यात शेट्टी म्हणाला "चला बसूया !!,सगळे पटकन तयार झाले जणू काही आमंत्रणाचीच वाट बघत होते . तोच पारकर आत शिरले. त्यांनाही सांगितल्याबरोबर होकार दिला आणि फोनकडे वळले . शांतपणे फोनवरून बायकोला सांगितले "आज उशीर होईल. कंपनीतल्या मित्रांबरोबर बाहेर बसतोय .मध्येच माझ्याकडे बघून खूण करून विचारले "जेवणाचे काय ?? मी खुणेनेच सांगितले घरी . तसे परत फोन कडे वळून बोलले" घरी येतोय जेवायला ,ठेव थोडे" . मग फोन ठेवून आमच्याकडे पाहून स्वच्छ हसले .
आमच्या रघुनाथला थोडी थट्टा करायची लहर आली .मोठ्याने म्हणाला "काय पारकर ,लग्नाला 25 वर्ष होऊन गेली तरी अजून घरची परमिशन घ्यावीच लागते का "?? झाले मी समजून गेलो आज पारकर टार्गेट होणार . तितक्यात पावसकर ओरडला ",हो !अजून विश्वासच नाही वहिनीचा नवर्यावर ,आम्ही बघा कधीही सांगत नाही ,काय करतो ,कुठे जातो ,उगाच कशाला मागे भुणभुण तिची. आणि तुम्ही तर रोजच्या 2 गाड्या चुकल्या तरी फोन लावून कळवता आज उशिर होईल म्हणून??
पारकर हसत शांतपणे ऐकत होते . रागावल्याचे चिडल्याचे चिन्हही त्यांच्या तोंडावर दिसत नव्हते .त्यांचा स्वभावच होता तसा . सर्वांचे झाल्यावर ते हळूच म्हणाले ",झाले तुमचे ?? आता माझे एका.हो मी प्रत्येक गोष्ट माझ्या घरी कळवतो. त्यांना सांगून सगळीकडे जातो पण लक्षात ठेवा मी त्यांची परमिशन घेत नाही तर त्यांना माझा ठावठिकाणा कळवतो . माझे माझ्या कुटुंबावर आणि कुटुंबाचे माझ्यावर प्रेम आहे . घरातील कर्ता पुरुष असलो तरी माझ्या मनाप्रमाणे वागावे असे काही नाही . साधा नोकरी करणारा माणूस आहे मी .त्यावरच माझे भागते . ह्या धकाधकीच्या जीवनात ,ट्रेनमधून धक्के खात कामावर येतो तेव्हा घरचे मी ऑफिस ला पोचलो कि नाही या चिंतेत असतात ,माझे काम काही फार जबाबदारीचे नाही त्यामुळे मला उशीर कधी होत नाही ,वेळेवर घरी जातो मग एखादा दिवस उशीर झाला कि घरचे काळजीत पडणारच ना ?? आणि हे पहा मला कोणतेही काम करायला बंदी नाही .ना कोणी रागावत माझ्यावर .उलट मी कुठे आहे .कोणाबरोबर आहे ,हे कळल्यावर त्यांची चिंताच दूर होते . तुम्हाला त्या wednsday चित्रपटातील comman man नसिरुद्दीन शहा आवडतो ,पटतो ,त्याचा तो संवाद आज शाम को घर लौटेंगे कि नही इसकी चिंता बीवी को होती है हे आवडते मग प्रत्यक्षातील सामान्य माणूस का आवडत नाही.
मी हसलो कारण पारकर काय चीज आहे हे मलाच माहित होते . त्याने जे काही तरुणपणी केले होते याची कल्पनाच बाकीचे लोक करू शकत नाहीत . पारकर पुढे म्हणाला ",तुम्ही घरी न सांगता कुठे कुठे जाता ,घरच्यांची पर्वा करीत नाहीत ,पण त्यांना तुमची पर्वा असते .आज मी तुमच्याबरोबर बसेन आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंद मी घेईन कारण माझ्या घरी या बद्दल सगळी माहिती आहे . पण तुमचे काय ?????? ते ऐकून मी मुकाट्याने उठलो आणि कोपऱ्यात जाऊन घरी फोन लावला .
Monday, February 13, 2017
जवान
कानावर हलकासा आवाज पडताच आबाजीने खाडकन डोळे उघडले आणि सवयीने बाजूला रायफलसाठी हात घातला . ती हालचाल बघत असलेली बायको हसून म्हणाली "आहो त्या सीमेवर नाही आहात. आता घरी आरामात झोपलायत.रिटायर्ड होऊन 3 वर्ष झाली तरी बंदुकीची सवय गेली नाही . आबाजी गालात हसला ,खळखळून हसायची सवय नव्हतीच त्याला .तीही सैन्यातली सवय ,सर्व कारभार गुपचूप ,सावध,आपल्या हालचालींचा कोणालाही मागोवा लागू द्यायचा नाही हे अंगात भिनलेले . तो उठला ,नेहमीचे विधी आटपून तहसीलदार काचेरीकडे निघाला . गेले वर्षभर हेच काम होते त्याचे .त्याला पाहून जिल्हाधिकारी नेहमीप्रमाणे गोड हसला ,"या आबाजी ,बोला काय काम "??? आबाजी हबकला "काय काम ?? आहो गेले वर्षभर एकाच कामासाठी तुमच्याकडे खेपा घालतोय " माझ्या जमिनीचे काम "?? हा हा हा !!ते होय ,होईल ना ,थोडी कागदपत्रे यायची बाकी आहेत ,ती आली कि देतो ताब्यात जमीन तुमच्या ,आहो जमीन आहे ती ,कुठे पळून जाणार आहे का ?? असे म्हणून पुन्हा गोड हसला . आबाजी परत हताश होऊन फिरला .
कसा कारभार करतात हे लोक ?? सैन्यातून निवृत्त होण्यापूर्वी आबाजीला 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल शौर्यपदक मिळाले होते आणि जमीन .तीही अत्यंत वाजवी भावात पण आज वर्ष होत आले तरी जिल्हाधिकारी त्या जमिनीचा ताबा देत नव्हता ,रोज नवी कारणे .
हे काही आपल्याला पटत नाही ,आबाजी विचार करू लागला . त्याला आठवली ती रात्र .
दहशतवाद्यांच्या ठिकाणाची खबर येताच त्यांचा मुख्य अधिकारी म्हणाला होता एकही दहशतवाद्या ला जिवंत सोडू अथवा पकडू नका .पकडलात तर त्याची सरबराई करण्यात दिवस जातील. आपल्याला कृती हवीय . हेच मनात ठेवून त्यांनी हल्ला केला . त्या पडक्या घरातून गोळीबार बंद होताच आबाजी आणि दुसरा जवान हातातील AK 47 सरसावत त्या घरात घुसले ,5 अतिरेकी मारून पडले होते त्यांच्या शरीराची गोळ्यांनी चाळण केली होती ,तर 4 जण हात वर करून उभे होते . 18 वर्षाचे कोवळे तरुण ,चेहऱ्यावर मृत्यूचे भय आणून थरथर कपात उभे होते .अबाजीच्या बरोबरच जवान हळहळला ह्या कोवळ्या पोरानं ठार मारायचे ????? काय चुकी यांची ? कोणाची चूक कोण भोगतोय ..गोळ्या घालायला मन काही तयार होईना अचानक त्यापैकीय एकाने पाठीमागे हात करून छोटे पिस्तूल काढले .चित्याप्रमाणे सावध असलेला आबाजी पुढे झाला .बंदुकीच्या एका फैरींत त्याने सर्वाना संपविले . कोऱ्या मनाने आबाजी युनिटकडे परतला जणू काही घडलेच नाही .
त्या घटनेची दाखल घेऊन सरकारने त्याला शौरपदक जाहीर केले आणि हि जमीन . निवृत्त होऊन आबाजी जमिनीचा ताबा घ्यायला आला पण थोडे कागदपत्र बाकी आहेत म्हणू थोडे दिवस थांब असे सांगण्यात आले ,असे करत वर्ष झाले तरी जमीन अजून ताब्यात आली नाही ."अरे काय चालू आहे हे ?? तो स्वतःशी पुटपुटला हेच दिवस बघायला का आम्ही माणसे मारणारी मशीन बनलो ,आमचे घर ,कुटुंब तुमच्या हवाली करून सीमेवर संपूर्ण देशाचे रक्षण करीत बसलो ,पण आज माझी जमीन मलाच मिळत नाही . रोज काही कारणे ,असा कारभार आम्ही केला असता तर हा देश परत गुलामगिरीत लोटला गेला असता . खिन्नपणे तो बाजूच्या चहाच्या टपरीकडे वळला
Sunday, February 12, 2017
ही आगळी कहाणी ......
ही आगळी कहाणी ...... निलेश मालवणकर रोज एकाच ही आगळी कहाणी ...... निलेश मालवणकर रोज एकाच प्रकारचे जेवण जेवताना कोणी तुम्हाला भेळ आणून दिली की तुम्हाला किती बरे वाटेल ??तसेच या पुस्तकाच्या बाबतीत माझे झाले .
सामाजिक ,फॅन्टसी ,विनोदी, वैज्ञानिक अश्या सर्व प्रकारच्या कथा या पुस्तकात आहेत .पहिली कथा वाचून आपणास असे वाटते कि हा विज्ञान कथा संग्रह आहे ,पण दुसरी कथा आपल्याला सोशल मीडियाच्या दुनियेत घेऊन जातो . तर काही कथा सामाजिक प्रश्नांवर मिश्किलपणे चर्चा करतात ,काही गंभीरपणे ,तरीही वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही असे लेखकाचे लिखाण आहे .काही कथा तर त्यांनी एका ओळीच्या विषयावर विस्तारल्या आहेत . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांना अनपेक्षित आनंद मिळतो .सरळसोपी नेहमीच्या वापरातील भाषा असल्यामुळे वाचक गालातल्या गालात हसत कथेचा आनंद घेतात . खरेच कथांची हि भेळ एकदा चाखून बघाच जेवण जेवताना कोणी तुम्हाला भेळ आणून दिली की तुम्हाला किती बरे वाटेल ??तसेच या पुस्तकाच्या बाबतीत माझे झाले .
सामाजिक ,फॅन्टसी ,विनोदी, वैज्ञानिक अश्या सर्व प्रकारच्या कथा या पुस्तकात आहेत .पहिली कथा वाचून आपणास असे वाटते कि हा विज्ञान कथा संग्रह आहे ,पण दुसरी कथा आपल्याला सोशल मीडियाच्या दुनियेत घेऊन जातो . तर काही कथा सामाजिक प्रश्नांवर मिश्किलपणे चर्चा करतात ,काही गंभीरपणे ,तरीही वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही असे लेखकाचे लिखाण आहे .काही कथा तर त्यांनी एका ओळीच्या विषयावर विस्तारल्या आहेत . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांना अनपेक्षित आनंद मिळतो .सरळसोपी नेहमीच्या वापरातील भाषा असल्यामुळे वाचक गालातल्या गालात हसत कथेचा आनंद घेतात . खरेच कथांची हि भेळ एकदा चाखून बघाच
Friday, February 10, 2017
लाइक द फ्लोइंग रिव्हर
लाइक द फ्लोइंग रिव्हर ......पाउलो कोएलो ..अनुवाद .. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
कोएलोच्या लघुकथा .जीवनाचे वेगवेगळे रंग दाखविणाऱ्या ह्या लघुकथा . कोएलोने आपल्या विचाराना मुक्त वाट करून दिली आहे .फ्लोईन्ग रिव्हर म्हणजे खळखळून वाहणारी नदी ,जी कुठेही थांबत नाही .फक्त वाहत राहते .त्याचप्रमाणे कोएलोचे विचार हि सतत चालत असतात .या कथा आहेत त्याच्या नशिबाच्या .त्याच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या घटनांच्या .काही मजेशीर गमतीदार,तर काही भावनिक अंतर्मुख करणाऱ्या .पण आपल्याला जीवनातील सत्य उलगडवून दाखवितात . कोएलोने यात काहीही शिकवणूक दिली नाही ,त्याने कसलेही स्पष्टीकरण करण दिले नाही .तो फक्त लिहित राहिला .
Valentine day
मला अचानक समोर आलेले पाहून बंड्या चपापला .हातातील वस्तू मागे लपविण्याचा प्रयत्न करू लागला . मी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो होतो ,पण बंड्याला पाहून हाक मारली ." अरे काय लपवतोय मागे ,?? बघू बघू ?? बंड्याने लाजून हातातील पॅकेट पुढे केले .गुलाबी रंगाच्या पेपर मध्ये एक चौकोनी बॉक्स होती . हळूच मान खाली घालून म्हणाला "गिफ्ट आहे मैत्रिणीसाठी, valentine डे जवळ आलाय ना "?? मी हसून मान डोलावली "वा छान!!. ,आणि पुढे निघालो .
बंड्या माझ्या सोबत चालू लागला "भाऊ ,तुम्ही कधी साजरा केलाय का valentine डे .मी हसलो, "का रे ??बाबा ,एके काळी मीही तरुण होतो . खूप मजा केली तेव्हा .,"आता नाही करत का ??? आता वाहिनीवर प्रेम कमी झाले का ?? बंड्याने हसून विचारले ." अरे बंड्या ज्याचे आपल्या माणसावर प्रेम असते त्यांच्यासाठी रोजच valentine डे असतो . तिच्यावरच प्रेम दाखवायला कोणत्याही डे ची गरज नसते ". "तसे नाही हो ,त्या निमित्ताने वहिनीसाठी गिफ्ट घ्याल तुम्ही".
,हे बघ बंड्या ,"मला ज्या दिवशी एखादी गोष्ट आवडते आणि ती बायकोला आवडेल असे वाटते त्यावेळी कोणताही विचार न करता मी ती गोष्ट घेतो तेव्हा पैश्याची काळजी करीत नाही ,घरी आल्यावर गिफ्ट घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जगातील सर्वात सुखी माणूस असल्यासारखे वाटते . मी थोडा भावूक होऊन बोललो ,बंड्या तुला खरे सांगू का ,तिचा रोजचा घरातील वावरच मला रोज valentine असल्यासारखे वाटते . तीची सकाळी उठून माझ्यासाठी ,मुलासाठी केलेली धावपळ सुखावते माझ्या मनाला .. तुला एक सांगू लग्नानंतर ऑफिस मध्ये सारखे सारखे येणारे फोन घेऊन कंटाळायचो मी ,हातातली कामे सोडून तिच्याशी सारखे बोलणे पटवायचे नाही मला ,एक दिवस चिडलो मी ,सारखे सारखे फोन का करतेस ??? तेव्हा चेहरा पडून म्हणाली तुमचा फोनवरच आवाज ऐकून खूप बरे वाटते मला ,तो आवाज ऐकण्यासाठीच फोन करते मी . खूप लाज वाटली स्वतः ची मला . पहिल्या valentine डे ला म्हटले चल बाहेर जाऊ फिरायला ,तेव्हा म्हणाली प्रेमाचा दिवस आहे मग तो आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांबरोबर साजरा करू ,आणि सर्वाना घरी बोलावून गोडाचे जेवण दिले ,दुसर्या दिवशी आम्ही फिरायला गेलो तेव्हा म्हणाली बघा आपल्या आयुष्यात 2 valentine डे आले .बंड्या प्रेमाचे हे फक्त एका दिवसाचे प्रदर्शन करणे पटत नाही आता ,तुलाही माझ्या वयाचा होशील तेव्हा असेच काहीसे वाटेल ,जेव्हढे प्रेम रोज कराल तेव्हडे ते वाढते . कधी बरे वाटत नसेल तेव्हा जवळच्यांच्या डोळ्यात बघ ,त्यात जी काळजी दिसेल तुझ्याबद्दल ते प्रेम ,तू रात्री 2 वाजता घरी येतोस तेव्हा दादा घरात चिंतेने येरझारा घालत असतात आणि तुला बघून गप झोपून जातात ते प्रेम, आई जेवून आलास का विचारते तो खरा valentine डे . बंड्या भारावून गेला .
"भाऊ तुम्ही कधीच तुमच्या भावना कोणाजवळ व्यक्त केल्या नाहीत ,वहिनी तर तुम्हाला दगड म्हणते ,खरेच तुम्ही तसे आहात का हो ?? आमच्याशी बोलतानाही तुमचा स्वर कठीण असतो .
" अरे वेड्या घरातील कर्ता म्हणून काही वेळा कठोर व्हावे लागतेच, याचा अर्थ माझे कोणावर प्रेम नाही असे होत नाही . फक्त ते व्यक्त करता येत नाही ,. मी वेळेवर घरी आलो नाही कि तुझ्या वहिनीचा चेहरा बघ कसा होतो ,मी काही तिच्यासाठी ,मुलासाठी घेऊन येतो तेव्हा पळत पळत तुमच्याकडे दाखवायला घेऊन येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ.अरे असे हजार valentine डे ओवाळून टाकतो त्यांच्यावर"
"खरेच भाऊ तुम्ही ग्रेट आहात ,हे सर्व माझ्या लक्षातच कधी आले नाही ,आज मैत्रिणीला भेटायचे कॅन्सल करतो आणि घरच्या सर्वाना बाहेर घेऊन जातो जेवायला ,ती मनीहि बरेच दिवस मागे लागलीय बाहेर जाऊ जेवायला म्हणून, तिलाही खुश करतो आज . मैत्रिणीला उद्या भेटेन ,तसे उद्याही गर्दी कमी असेल पार्कात ,आरामात गप्पा मारत येतील .असे बोलून धावतच घरी गेला .
Sunday, February 5, 2017
इराकहून सुटका ( मूळ पुस्तक BETRAYED) ....लतिफा अली आणि रिचर्ड शिअर अनुवाद .. सिंधू जोशी
इराकहून सुटका ( मूळ पुस्तक BETRAYED) ....लतिफा अली आणि रिचर्ड शिअर अनुवाद .. सिंधू जोशी
मुळातच लतिफा सनातन कुर्दी जमातीतील होती . सद्दाम हुसेनने त्यांच्या कुटुंबाचा वध करायचा आदेश दिल्यावर ते पळून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.,मग त्या खुल्या वातावरणातच लतिफाचे तरुणपण गेले .पुढे तिच्या कुटुंबाने जर्मनीत स्थलांतर केले आणि वडील परत इराकला परतले . सनातन मुस्लिम चालीरीतीविरुद्ध वागल्याने तिला इराकला वडिलांकडे पाठविण्यात आले आणि तिथेच जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले .एक मुस्लिम स्त्री म्हणून ती कोणाशी बोलू शकत नव्हती ,ना कोणत्याही दूतावसाशी संपर्क करू शकत होती . तिच्या सुटकेच्या धडपडीमुळे तिचा छळ वाढत गेला. तसे तिने इराकी रूढी परंपरा आणि संस्कृती विरुद्ध जणू युद्धच पुकारले . तिचे सुटकेचे सारे प्रयत्न फोल ठरू लागले पण त्याही परिस्थितीत तिने हार न मानता युनो च्या लोकांशी जवळीक साधली आणि देशाच्या सीमेपर्यंत पोचली ,इराकच्या जुलमी चालीरीती आणि स्त्रियांना मिळणाऱ्या जुलमी वागणुकीची अंगावर शहारे आणणारी सत्यकथा