Rifle Club
रायफल क्लब
साल 1991
दयानंद भरेने एका नाईट क्लबमध्ये आपल्या मुलाच्या बिचूच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज केली होती. दयानंद मोठा गँगस्टर, तो सर्व काळे धंदे करतो. भिरा त्याचा दुसरा मुलगा.दोघेही मुले बापाच्याच वळणावर गेली आहेत. त्या पार्टीत बिचू एका डान्सर मुलीचा किस घ्यायचा प्रयत्न करतो पण तिचा प्रियकर अली आडवा येतो आणि त्या गडबडीत बिचू मारला जातो.
शहाजहान अलीचा भाऊ लागतो.शहाजहान एक प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या एका कॅरेक्टरच्या तयारीसाठी तो रायफल क्लबमध्ये जाणार आहे.नवीन चित्रपटात तो एका शिकारीची भूमिका करतोय.
कुझीवेली रायफल क्लबचा प्रमुख आहे.तर त्याचा जावई अवरण सेक्रेटरी आहे.त्यांची मोठी फॅमिली असून ते सर्व पट्टीचे शिकारी आहेत.
अली शहाजहानकडे मदत मागण्यासाठी रायफल क्लबमध्ये येतो. ते रायफल क्लबमध्ये आहेत याची खबर दयानंदला मिळते आणि तो पूर्ण ताकदीने रायफल क्लबच्या दिशेने जातो.
अत्याधुनिक शस्त्रे आणि तरुण गुंडाशी रायफल क्लबचे सदस्य सामना करतील. त्यांच्याकडे जुन्या दुनळीच्या रायफल आणि मोजक्याच बुलेट्स आहेत.पण ते हाडाचे शिकारी आहेत.
ही लढाई रंजक आणि थरारक होणार हे नक्की.
अनुराग कश्यप हल्ली दक्षिणेच्या चित्रपटात प्रमुख भूमिका करू लागलाय. त्याचा दयानंद क्रूर आणि थंड रक्ताचा आहे.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.
No comments:
Post a Comment