The Trauma Code : Heroes On Call
द ट्रुमा कोड : हिरोस ऑन कॉल
सर्वच हॉस्पिटलमध्ये एक अपघात विभाग असतो.जो नेहमी इमर्जन्सी असतो.कोरियातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रामा विभागातील मुख्य डॉक्टरचा अति कामाने मृत्यू होतो. सरकारकडून त्या हॉस्पिटलला मोठा निधी मिळतोय.त्यामुळे आरोग्यमंत्री स्वतः डॉ. बेक कांग ह्युकची नेमणूक करते.
हॉस्पिटल ट्रामा विभागात जास्त खर्च होतो म्हणून तिथे लक्ष देत नसते. त्यामुळे मनाविरुद्ध डॉक्टरची नेमणूक झाल्यामुळे नाराज होते.
डॉ. बेक एक कुशल सर्जन आहेत.पेशंटचे प्राण वाचविण्यासाठी ते काहीही करतात .कोणतेही नियम पायदळी तुडवू शकतात.त्याच्याकडे आलेल्या पेशंटसाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात.
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याबरोबर ते ज्युनियर डॉक्टरच्या मदतीने पेशंटचे प्राण वाचवतात. ते स्वतःची ट्रामा टीम बनवतात.यांग जाई ज्युनियर डॉक्टर आणि चेन जंग ही नर्स त्यांच्या टीममध्ये असते. हॉस्पिटलची मॅनेजमेंट त्यांच्या विरुद्ध आहे पण डॉ. बेक सर्वाना पुरून उरतो.
या सिस्टीमविरुद्ध लढून तो शेकडो लोकांचे प्राण वाचवतो हे पाहणे खूपच रंजक आहे. ही एक हलकीफुलकी कोरियन सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
एकदा पाहायला सुरवात केली की संपेपर्यंत थांबू शकणार नाही अशी सिरीज आहे.
No comments:
Post a Comment