Tuesday, January 21, 2025

पाताल लोक 2

पाताल लोक..सीजन 2
Paatal Lok... Season 2
पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात इंस्पेक्टर हाथीराम चौधरी जास्त आत्मविश्वासाने भरलेला दिसतो.अर्थात पहिल्या भागात त्याने जे काही केले त्याचे योग्य फळ मिळालेच नाही .पण त्याच्यात आत्मविश्वास आलेला दिसतो.
अजूनही तो दिल्लीतील पोलीस चौकीत इन्स्पेक्टरच आहे.त्याचा ज्युनियर असलेला अन्सारी परीक्षा देऊन डिसीपी झालाय. 
त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये येऊन ती बाई पोलिसाशी भांडत होती.बाई गरीब  दिसत होती.तिच्यासोबत साधारण सहा वर्षाचा मुलगा होता.तिचा नवरा रघू चार दिवस गायब होता.तो छोटी मोठी मजदूरीची कामे करतो.कधीकधी बॅंड पथकात बँड वाजवतो.तर कधी कधी नागालँडला मालाची डिलिव्हरी आणायला जातो.पण आता तो गायब आहे.
हाथीराम चौधरी तिची कहाणी ऐकून त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो.
दिल्लीतील नागालँड भवनमध्ये काही नेते बिझनेस मिटिंगसाठी आलेले असतात. जोनाथन थोम नागालँडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय नेता आहे.त्याच्याशिवाय मिटिंग यशस्वी होणार नसते.पण सकाळी त्याचे मुंडकेविरहित प्रेत टबमध्ये सापडते. स्पेशल केस म्हणून सरकार डीसीपी अन्सारीला नियुक्त  करते.
सीसी टीव्हीच्या फुटेजमध्ये रघु एका नागा मुलीसोबत रेल्वे स्टेशनवर दिसतो.तीच मुलगी त्या नागालँड सदनमध्ये ही दिसली होती.
अन्सारी आपल्या मदतीला हाथीराम चौधरीला घेतो.या प्रकरणाची मुळे नागालँडपर्यंत पसरलेली असतात.अन्सारी आणि हाथीराम चौधरी नागालँडला पोचतात.तिथे डीसीपी मेघना बरूआ त्यांच्या सोबत असते.पण तिथे गेल्यावर खुनाची मालिकाच सुरू होते.
एक साधे हरवलेल्या गरीब मजदूराचे प्रकरण इतक्या मोठ्या षडयंत्राशी जुडलेले असेल याची कल्पनाही हाथीराम चौधरीला नसते.
नागालँडची सफर करून देणारी ही सिरीज प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.
जयदीप हलावत इंस्पेक्टर हाथीराम चौधरीच्या हातखंडा भूमिकेत आहे. तर ईश्वकसिंह अन्सारीच्या भूमिकेत आहे.

No comments:

Post a Comment