Thursday, January 2, 2025

LA PALMA

LA PALMA
ला पाल्मा
ला पाल्मा स्पेनमधील एक सुंदर बेट आहे. बरेचसे लोक तिथे पर्यटनला सुट्टी मजेत घालवायला येतात. फेडरीकही आपल्या बायको मुलांसह सुट्टीत आलाय. त्याला एक मुलगी आणि मुलगा आहे.
हवामान खात्यात  काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ला पाल्माच्या डोंगरावर एक मोठी भेग शोधून काढली.ती भेग हळूहळू मोठी होतेय. काही काळाने त्यातून लाव्हा बाहेर पडू शकतो आणि डोंगर तुटून समुद्रात कोसळून त्सुनामी येऊ शकते . ते अधिकारी सरकारला सावध करतात पण सरकार फारसे लक्ष देत नाही.
शेवटी तो क्षण येतोच आणि डोंगरातून लाव्हा बाहेर पडतो.
सरकार ला पाल्मावरील हजारो पर्यटकांना वाचवू शकेल का ?
फेडरीक आपल्या कुटुंबाला घेऊन सेफ ठिकाणी जाईल का ?
निसर्गाच्या रौद्र रुपाशी लढाई देणारी एक थरारक सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment