सूक्ष्मदर्शीनी
Sookshmadarshini
एखाद्या स्त्री च्या मनात संशयाचे बीज उत्पन्न झाले की त्याचे निवारण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.
प्रिया उच्चशिक्षित गृहिणी आहे. आपला पती अँथोनी आणि छोटी मुलगी कामीसोबत राहतेय. ती राहतेय त्या बंगल्याची मोठी कॉलोनी आहे.
आता त्यांच्या शेजारी मॅन्युअल आपल्या वृद्ध आईसोबत राहायला आलाय. मॅन्युअल साधा सरळ माणूस आहे. त्याची शहरात बेकरी आहे.आईला विस्मृतीचा आजार आहे असे सांगतो.पण प्रियाला ते खरे वाटत नाही.ती उच्चशिक्षित असल्यामुळे याची खोलवर जाऊन चौकशी करते. ती मॅन्युअलच्या आईलाही भेटते.
प्रियाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत असताना अचानक मॅन्युअलच्या घरी आग लागते आणि त्याची आई गायब होते. सर्वजण तिचा शोध घेतात.दोन दिवसानंतर ती रेल्वे स्टेशनवर सापडते.
दरम्यान प्रिया किचनमधून मॅन्युअलवर आणि त्याच्या घरावर लक्ष ठेवून असते. काही दिवसांनी मॅन्युअलची आई पुन्हा गायब होते. तेव्हा तिची न्यूझीलंडला राहणारी मुलगी भारतात येते.
प्रियाला मॅन्युअलची आई घरात असल्याचा भास होतो.तिच्या मनात मॅन्युअलविषयी संशय वाढत जातो. मॅन्युअलची बहीण न्यूझीलंडला परत जाते .पण प्रियाशी तिचा कॉन्टॅक्ट तुटतो.
वरवर अतिशय साध्या वाटणाऱ्या गोष्टीत अनेक धोकादायक गोष्टी लपलेल्या असतात.प्रिया आपल्यापरीने त्याचा शोध घेत असते आणि तिला अनेक धक्कादायक गोष्टी कळतात आणि तिच्या जीवावरही बेततात.
एक कौटुंबिक भासणारा चित्रपट हळूहळू गडद रहस्याकडे वळू लागतो आणि आपला श्वास रोखून धरतो.
No comments:
Post a Comment