Court
कोर्ट
चंद्रशेखर वय वर्षे 19 एका वॉचमनचा मुलगा. तो रस्त्यावर सिम कार्ड विकतो .बारमध्ये बियरचे प्रमोशन करतो .बाईकवरून फिरतो.त्याचे वडील त्याला चांगले शिक्षण घे म्हणून मागे लागले असतात पण तो ऐकत नाही.
त्याचवेळी जबीली त्याच्या प्रेमात पडते. ती अल्पवयीन असून कॉलेजमध्ये जाते. तिचे घराणे मोठे आहे.आजोबा प्रतिष्ठित व्यक्ती तर काका राजकारणी आणि गहू फॅक्टरीचा मालक.त्याला आपली प्रतिष्ठा महत्वाची आहे.
जबीली आणि चंद्रशेखरच्या संबंधाची त्याला कल्पना येते आणि आपले वजन आणि पैसे वापरून तो चंद्रशेखरला तुरुंगात टाकतो.
एक प्रसिद्ध वकील दामू त्याच्या साथीला आहे. दामू आपले डावपेच वापरून चंद्रशेखरला जामीनही मिळवून देत नाही.उलट तो त्याच्यावर पोस्कॉ कायदा लावतो.
आज साधारण 78 दिवस झाले .चंद्रशेखर तुरुंगात आहे.चार दिवसांनी त्याचा निकाल आहे.निकाल त्याच्याविरुद्ध आहे हे निश्चित झालेय.
त्याचवेळी चंद्रशेखरच्या वडिलांना एक वकील अडव्होकेट मोहन रावला भेटण्याचा सल्ला देतो.शेवटचा प्रयत्न म्हणून ते मोहन रावकडे जातात.
अडव्होकेट सुर्या तेजा मोहन रावचा ज्युनियर वकील.तो हुशार आहे पण उतावळा आहे.तो ही केस ऐकून घेतो आणि मोहन रावला सांगतो. या केसमध्ये काही होणार नाही असे सांगून ते नकार देतात तेव्हा त्यांच्या नावावर ही केस स्वतः लढायची असे सुर्या तेजा ठरवितो.
सोमवारी निकाल सांगायच्या आधी तो आपले वकीलपत्र सादर करतो आणि केस लढायची तयारी करतो.
पोस्को सारख्या कायद्याखाली अटक केलेल्या चंद्रशेखरला सुर्या तेजा सारखा नवखा कोर्टात पहिल्यांदाच उभा राहिलेला ज्युनियर वकील दामूसारख्या अनुभवी वकिलाला टक्कर देईल का ?
No comments:
Post a Comment