Wednesday, April 23, 2025

डियर चाईल्ड

Dear Child
डियर चाईल्ड
तेरा वर्षांपूर्वी लीना बेक या तरुणीचे अपहरण झालेय .पण अजूनही तिचा शोध लागला नाही . 
जर्मनीतील जंगलात सैनिक बेस आहे पण तिथे आता सैन्य नाहीय.त्यातील एका बंद खोलीत एक स्त्री आपल्या दोन लहान मुलांसोबत कैदेत आहेत. हाना नावाची मुलगी आणि जोनाथन नावाचा मुलगा आहे.त्या स्त्रीचे नाव लीना आहे.लहान मुलांना माहीत नाही आपण कैदेत आहोत. आपले वडील आपली छान काळजी घेतात शिस्त लावतात आई नेहमीच चुकते म्हणून तिला मार मिळतो असेच त्यांना वाटते .
एके दिवशी लीना त्या व्यक्तीवर हल्ला करून  बंद खोलीतून बाहेर पडते पण जंगलात कुठे जायचे तेच तिला माहीत नाही.योगायोगाने ती एका कारला धडकते आणि हॉस्पिटलमध्ये पोचते. हानाही तिच्यासोबत बाहेर पडलीय.
लीना बेकच्या केस ऑफिसरला हे कळते आणि तो लीनाच्या आई वडिलांना कळवितो.पण हॉस्पिटलमध्ये तिला पाहिल्याबरोबर ती लीना नाही असे आई वडील  खात्रीने सांगतात.पण हाना त्यांना आजोबा म्हणून हाक मारते. हानाच्या डीएनएमध्ये लीना आणि इतर काही पुरुषांचे अंश सापडतात .त्या बंद खोलीत अपहरणकर्त्याची बॉडी सापडते पण त्याचा डीएनए मॅच होत नाही. म्हणजेच अजून काहीजण यात सामील असावेत.
जंगलातील त्या सैनिक बेसवर अजून काही तरुण स्त्रियांची प्रेते सापडतात ज्या मागील दहा बारा वर्षे बेपत्ता आहेत.
खरी लीना कुठेय ? त्या मृत तरुणी कोण आहेत ? 
या सर्व प्रकरणात हानाची मुख्य भूमिका आहे .तिचे रहस्यमय वागणे सर्वानाच खटकतेय .ती हुशार आहे .आत्मविश्वासाने बोलते. 
सहा भागांची ही रहस्यमय सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment