Test
टेस्ट
अर्जुन सध्याचा भारताचा टॉप क्लास क्रिकेटपटू. पण आता तो फॉर्ममध्ये नाहीय. त्यातच भारत पाकिस्तानची तिसरी आणि फायनल टेस्ट मॅच तीन दिवसांवर आलीय.कर्णधार आणि कोच अर्जुनला खेळवायला नाखूष आहेत पण अर्जुनला स्वतःविषयी खात्री आहे . त्याला नाही निवडले तर तो मिडियाकडे जाईन अशी धमकी देतो. त्याला छोटा मुलगा आहे जो शाळेतून क्रिकेट खेळतो.
सर्वाना उर्फ सारा एमआयटीमधून शिकून आलाय. पाण्यापासून इंधन बनवायचे त्याचे स्वप्न आहे.प्रोजेक्ट तयार आहे तो अप्रुव्हलसाठी फिरतोय.सध्या तो एक कॅन्टीन चालवतोय . कॅन्टीनसाठी कर्जाने घेतलेले पैसे तो प्रोजेक्टसाठी वापरतोय.
कुमुध साराची पत्नी.लग्नाला बरीच वर्षे झाली पण त्यांना मूल नाही.तिला ट्रीटमेंटसाठी पैश्याची गरज आहे.सारा तिला फक्त आश्वासन देतोय. ती शाळेत टीचर आहे जिथे अर्जुनचा मुलगा अदित्य शिकतोय.कुमुद अर्जुनची बालमैत्रीण आहे आणि तिचे वडील अर्जुनचे पाहिले कोच होते.
काळ्या बाजारात भारत पाकिस्तान सामन्यावर मोठा सट्टा लावला गेलाय. साराला कर्ज देणारी माणसेही या सट्टामध्ये गुंतली आहेत.ते अर्जुनला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर ते पन्नास लाखासाठी साराच्या मागे लागलेत.
अर्जुनची तिसऱ्या टेस्टसाठी नाईलाजाने निवड होते. पण अर्जुन यात चांगला खेळेल ?
साराचा प्रोजेक्ट अप्रुव्ह होईल का ? तो पन्नास लाखाचे कर्ज फेडण्यासाठी कोणते पाऊल उचलतो.
कुमुद आपल्या ट्रीटमेंटसाठी पैश्याची व्यवस्था करेल का ?
या सर्वांची उत्तरे मिळवायची असतील तर नेटफ्लिक्सवर टेस्ट पाहायला हवा.
नयनताराने हतबल झालेली कुमुद उभी केलीय.तर माधवन अगदी सहजपणे साराची भूमिका जगतोय.सतत टेन्शनमध्ये असलेला अर्जुन सिध्दार्धने छान रंगविला आहे.
No comments:
Post a Comment