Gaami
गामी
शंकर एक अघोरी साधू .पण त्याच्यात एक विचित्र गोष्ट आहे. कोणीही स्पर्श केला तर त्याला जणू इलेक्ट्रिक शॉक बसायचा. तो बेशुद्ध व्हायचा.याच कारणामुळे त्याला अघोरी पंथातून काढून टाकलंय .आता त्याला यावर उपाय शोधायचा आहे आणि त्यासाठी तो प्रयागराजच्या कुंभमेळ्यात आलाय.
तिथे त्याला एक साधू उपाय सांगतो.हिमालयाच्या एकदम वर बर्फाळ भागात जिथे कोणीही जात नाही अश्या ठिकाणी दर छत्तीस वर्षानंतर चमकणारे मश्रुम उगवते .ते फक्त चोवीस तास प्रकाशित असते .ते मश्रुम त्याच्या हाती पडले. तर त्याचा हा आजार बरा होईल. पण त्याच्या हातात फक्त पंधरा दिवस आहेत.
डॉ. जान्हवीला देखिल ते मश्रुम हवे आहेत आणि ती शंकर सोबत जाण्यास तयार होते. हा प्रवास खडतर आहे याची जाणीव दोघांनाही आहे.
दक्षिणेत एका छोट्या गावात छोटी उमा राहते.तिच्या आईने देवदासी बनून उमाला मावशीकडे सोडले .पण आता ती आजारी पडली म्हणून देवदासीतून तिला मुक्त केले आणि तिच्या जागी उमाला आणायचे ठरविले पण उमा तिथून पळाली.
चायना बॉर्डरवर एका अनोळखी ठिकाणी काही मानवांवर प्रयोग चालू आहेत.चीनचे प्रमुख अधिकारी यात गुंतले आहेत.आता ज्या मुलावर प्रयोग चालू आहेत त्याला CT- 333 नाव दिले आहे.
काय संबंध आहे या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी ? शंकर या जीवघेण्या आजारातून मुक्त होईल का ? उमा देवदासी बनेल ? CT- 333 त्याच्यावर होणाऱ्या जीवघेण्या प्रयोगातून सुटका करून घेईल का ??
एक रहस्यमय प्रवास जो आपल्याला हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात गुंतवून ठेवेल.जिथे तुमची नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ आहे . तिथे लांडगे आहेत ,सिंह आहेत ज्यांना शिकार हवीय.
चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. हिमालयातील अप्रतिम फोटोग्राफी आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते पण तितकेच रक्त ही गोठवते .
No comments:
Post a Comment