The Fall of the House of Usher
द फॉल ऑफ द हाऊस ऑफ अशर
जगातील सर्वात मोठ्या फॉरच्युनेटो फार्मा कंपनीच्या सीईओ रोड्रिंक्स अशरची सहा मुले अवघ्या दोन आठवड्यात अपघाती मृत्युमुखी पडतात. खरेतर फॉरच्युनेटो फार्मावर अनेक खटले चालू आहेत. ते औषधांच्या नावाखाली ड्रग बनवितात.खोट्या ट्रायल घेऊन हजारो लोकांना ठार मारले आहेत. असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत.त्यातच आता अशर कुटुंबातील एकजण त्यांच्याविरुद्ध साक्ष देणार आहे असे सरकारी वकील कोर्टात जाहीर करतो आणि अशर कुटुंबात गोंधळ उडतो.
रोड्रिंक्स अशरची सहा मुले आहेत. त्याला पत्नीपासून दोन आणि काही स्त्रियांपासून चार मुले आहेत.त्याने सगळ्यांना स्वीकारून आपल्या फॅमिलीत योग्य स्थान दिलंय .आता फॅमिलीत गद्दार कोण हे त्याला शोधून काढायचे आहे. रोड्रिंक्सची बहीण मेडेलिन धूर्त कावेबाज स्त्री आहे. पडद्यामागून तीच सारी सूत्रे हलविते आहे.तिला कंपनीची सर्वेसर्वा होण्याची इच्छा आहे.
गद्दार शोधायला लाखो रुपयांचे बक्षीस रोड्रिंक्सने जाहीर केले.आणि त्यातूनच त्याच्या सर्व मुलांचा मृत्यू होतो. शेवटी रोड्रिंक्स सरकारी वकिलाला अपराधाची कबुली द्यायला आपल्या जुन्या घरात बोलावतो आणि पूर्वायुष्य त्याच्या समोर उघड करतो.
भूतकाळ आणि वर्तमान काळात रंगलेली ही अशर परिवाराची कहाणी आपल्याला खिळवून ठेवते. यात एक भयानक रहस्य दडलेले आहे.अशर फॅमिलीला या स्थानावर येण्यासाठी किती कट कारस्थाने करावी लागली हे पाहून अंगावर काटा येतो.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment