समर पब्लिकेशन
धर्म म्हणजे काय ? युधिष्ठिराचा धर्म खरा ? तो कधीच अधर्माने वागला नाही का ? कर्ण ,एकलव्य , आणि अश्वत्थामा धर्माचा खरा अर्थ शोधायला बाहेर पडले आहेत. अश्वत्थामाने अधर्माने वागून झोपेत असलेल्या पांडव कुळाचा नाश केलाय.त्याच्या मते वडील द्रोणाचार्यांना अधर्माने वागूनच वध केलाय.तर एकलव्याला काहीच न शिकवता केवळ तो अर्जुनाच्या वरचढ होऊ नये म्हणून गुरुदक्षिणा रूपाने त्याचा अंगठा मागून घेतला. कर्णाने द्रौपदी वस्त्रहरणात बघ्याची भूमिका घेऊन अधर्माची साथ दिली असा आरोप आहे.
आता ते तिघेही एकत्र येऊन धर्माचा खरा अर्थ शोधायला कोकणातील पचवणी गावात आले.हे गाव जणू संताचे गाव म्हटले जाते. इथली सर्व माणसे सदाचारी आणि धार्मिक आहेत.
गावात आल्यावर तिघेही आपल्या सोयीनुसार काम शोधतात .आणि त्यांना काही अश्या व्यक्ती भेटतात त्यामुळे त्यांच्या मनातील गोंधळ वाढतो.
खरोखर या तिघांना धर्माचा कळेल का ?? की अजून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल ?
No comments:
Post a Comment