Spider noir
स्पायडर नोइर
बेन रिली वृद्ध खाजगी गुप्तहेर . छोटी छोटी प्रकरणे तो हाताळतो.एके काळी तो सैन्यात मेजर होता.फ्रान्समध्ये त्याने जर्मन हॉस्पिटलमधून आपले काही सैनिक सोडवले होते.त्या सैनिकांवर विविध प्रयोग चालू होते.त्यातीलच एक सैनिक त्याच्या हाताला चावला.बरे होताच त्याला आपल्यातील शक्तीची जाणीव झाली.तो स्पायडरमॅन बनला होता.नंतर त्याने सुपरहिरो बनून अनेकांचे प्राण वाचविले. पण त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने हे सर्व सोडून सामान्य गुप्तहेराचे जीवन जगू लागला.
पण आता हॉस्पिटलमधून वाचविलेल्या मित्राच्या सुपरपॉवर जागृत झाल्यात. पण शहरातील काही व्यक्ती आहेत जे ह्या सुपर हिरोला आपल्या ताब्यात ठेवू पाहतायत. एक जर्मन डॉक्टर गेली अनेक वर्षे एका औषधाचा शोध घेतेय जे घेतल्यावर त्यांच्यातील सुपर पॉवर नष्ट होतील.
बेन पुन्हा सुपरहिरो बनून आपल्या मित्रांना वाचवेल का ?
निकोलस केज सारखा मातब्बर अभिनेता पहिल्यांदाच या सिरीज द्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करतोय.
ही सिरीज ब्लॅक ऍण्ड व्हाईट आणि रंगीत अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment