आराचर (मल्याळी ) ... के.आर. मीरा
लेडी जल्लाद .….रेश्मा कुलकर्णी- पाठारे
मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतात पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जतीनचंद्रला लहान मुलीवर बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यावर सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता फाशीची शिक्षा जाहीर केली होती.
फणीभूषण ग्रद्धा मलिक सरकारी अधिकृत जल्लाद आहे.आता तो 88 वर्षाचा आहे.तो राहतोही स्मशानाच्या वाटेवर, जिथून सगळ्या अंत्ययात्रा जातात.त्याचे चहाचे दुकानही आहे.अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे तिथेच चहा पितात.
जल्लाद मलिकच्या घराण्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे .असे फणीभूषण ग्रद्धा मलिक अभिमानाने सांगतो. त्याने आता पर्यंत चारशे एकावन्न जणांना फाशी दिलेय असेही सांगतो.तो हुशार आणि स्वार्थी आहे.आपल्या शिवाय सरकारला पर्याय नाही हे त्याला पक्के माहितीय म्हणूनच त्याने सरकारला वेठीस धरून काही मागण्या केल्यात.यात आपल्या मुलीला चेतना ग्रद्धा मलिकला अधिकृत जल्लादाची नेमणूक करावी.फाशीची रक्कम वाढवून देण्यात यावी .अश्या मागण्या आहेत.
चेतना बावीस वर्षाची तरुणीतिच्या रक्तातच जल्लाद असल्याने तिला कुशलतेने गाठ मारता येते. आपले घराणे जल्लादाचे असल्याने त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम तिने भोगले आहे .ती उत्कृष्ट जल्लाद बनेल याची खात्री तिच्या बापाला आहे.
संजीवकुमार मित्रा एका न्यूज चॅनेलचा वार्ताहर .लेडी जल्लाद चेतना मलिकचा आपल्या वाहिनीला कसा फायदा होईल याचाच विचार त्याच्या डोक्यात सतत चालू आहे.त्यासाठी त्याने चेतना आणि फणी मलिकला हाताशी धरले आहे.त्याच्या वाहिनीवर रोज चेतानाची मुलाखत चालू आहे.
ग्रद्धा मलिक कुटुंबात कित्येक शतकातील फाशी आणि जल्लादाच्या कथा आहेत.त्या संदर्भानुसार आपल्या समोर येतात .जतीनचंद्रला फाशी जाहीर झाल्यापासून ते फाशी देईपर्यंतचा काळ या पुस्तकात लिहिला गेलाय. या संपूर्ण पुस्तकात मृत्यू जाणवत राहतो.तो कसा असतो याची जाणीव सतत आपल्याला वाचताना होत असते तरीही आपण ते पुस्तक हातातून सोडवत नाही.आपण ते वाचत राहतो. अंगावर काटा आणत मृत्यू अनुभवत राहतो.
यात अनेक पात्रे भेटतात .बहुतेक पात्रे स्वार्थी आहेत. चेतना या सर्वांना सामोरी जात आपले कर्तव्य पार पडेल का ?
No comments:
Post a Comment