रहस्य प्राचीन नटराजाचे
'अ टाइम टू बर्निश' (A Time to Burnish)
राधिका नाथन
अनुवाद डॉ. मीना शेटे-संभू
'मेहता पब्लिशिंग हाऊस'
टॉम आणि जॉश हे दोन भाऊ लंडनमध्ये राहत असतात. त्यांपैकी टॉम हा अपंग असून तो लंडनच्या एका प्रसिद्ध म्युझियममध्ये काम करतो. पुरातन मूर्तींचा अभ्यास आणि पारख करण्यात तो निष्णात मानला जातो. नुकतीच त्याने भारतातून नटराजाची एक प्राचीन मूर्ती आपल्या म्युझियमसाठी आणली आहे. मात्र, काही केल्या ती मूर्ती अस्सल नसून बनावट असावी, असा संशय टॉमच्या मनात येतो. ही नटराजाची मूर्ती साधारण सात फूट उंच असून ती कांस्य धातूची बनलेली आहे.
दुसरीकडे, टॉमचा भाऊ जॉश हा एक संगणक तज्ज्ञ आहे. त्याला या मूर्ती किंवा पुरातन वस्तूंच्या प्रकरणात अजिबात रस नसतो. परंतु, भावाच्या विशेष आग्रहाखातर आणि त्याच्या सांगण्यावरून तो या मूर्तीचे सत्य शोधण्यासाठी तामिळनाडूत येतो. टॉम त्याला असे सांगतो की, भारतात पोहोचल्यावर त्याची मैत्रीण विद्या या कामात त्याला पूर्ण मदत करेल.
नाईलाजास्तव जॉश भारतात येतो आणि तामिळनाडूत येऊन या नटराजाच्या मूर्तीमागील गूढ रहस्य शोधू लागतो.
ती नटराजाची मूर्ती खरोखरच हजारो वर्षे जुनी आणि अस्सल आहे, की हल्लीच हुशारीने ओतीवकामातून (casting) बनावट बनवली गेली आहे?
विद्या आणि जॉश या दोघांना या रहस्याचे सत्य शोधून काढण्यात यश येईल का?
No comments:
Post a Comment