Woman Of The Dead 2
वुमन ऑफ द डेड 2
ज्यांनी पहिला सीजन पाहिला आहे त्यांना हा दुसरा सीजन लक्षात येईल.
ब्लूमने आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेऊन आता दोन वर्षे झाली आहेत.तिचा मृत व्यक्तींना सजवून कॅफिनमध्ये ठेवायचा व्यवसाय अजूनही चालू आहे. तिचे गाव छोटे असल्यामुळे सगळेच सर्वाना ओळखतात .
आज दोन वर्षानंतर स्मशानात कोणाचीतरी कॅफिन बाहेर काढायची तयारी चालू आहे.योगायोगाने त्याच कॅफिनमध्ये ब्लूमने आपल्या पतीच्या खुन्याचे तुकडे करून भरले आहेत. तिचा सहकारी ही गोष्ट सांगतो आणि ब्लूम रात्रीच त्या कॅफिनमधील तुकडे पळविण्याचा प्रयत्न करते.पण काही तुकडे राहून जातात आणि त्याची ओळख पटते.
आता संशयाची सुई ब्लूमकडे वळते. पोलीस ब्लूम आणि तिच्या सहकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतात . त्याचवेळी ब्लूमच्या तरुण मुलीचे निशाचे अपहरण होते. निशाच्या सुटकेच्या बदल्यात ब्लूमकडे काही व्हिडिओची मागणी केली जाते ज्याची काहीच माहिती तिला नाही.
ब्लूमला आता स्वतःसोबत आपल्या मुलीचीही सुटका करायची आहे.ती मुलीच्या सुटकेच्या प्रयत्नात असताना काही अनपेक्षित सत्य तिच्या समोर येतात आणि ती हादरून जाते.
एका आईने प्राण पणाला लावून आपल्या मुलीच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न पहायचे असतील तर ही सिरीज नक्की पहा.
No comments:
Post a Comment