सुझल 2
SUZHAL 2
नंदिनीची केस चेल्लाप्पा लढतोय.ते गावातील सिनियर वकील आहेत. नंदिनी खुनाच्या आरोपातून सुटेल याची त्यांना खात्री आहे.इंस्पेक्टर चक्रवर्ती उर्फ सक्काराई नंदिनीचा मित्र आहे आणि त्याचे संगोपनही चेल्लाप्पाना केलंय.
त्या दिवशी सक्काराइ चेल्लाप्पाला भेटायला त्यांच्या गावाबाहेरच्या कॉटेजमध्ये जातो.कॉटेज आतून बंद असते आणि खिडकीतून सक्काराईला चेल्लाप्पाचा मृतदेह दिसतो .तो पोलिसांना बोलावतो आणि दरवाजा तोडून आत घुसतो तेव्हा चेल्लाप्पाच्या डोक्यात गोळी शिरून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. प्रथमदर्शनी ही आत्महत्या आहे असे लोकल पोलीस इंस्पेक्टर मूर्थीचे म्हणणे असते .पण एका बंद कपाटात मुत्थू नावाची तरुणी हातात पिस्तुल घेऊन सापडते.
मुथ्यू जरी कपाटात सापडते तरी कपाटाचा दरवाजा बाहेरून कोणी बंद केला हा प्रश्न आहेच.हाय प्रोफाइल केस आहे म्हणून वरिष्ठ सक्कराईलाच ह्या केसची जबाबदारी देतात आणि मूर्थीला त्याचा सहाय्यक बनवितात.
प्रसारमाध्यमातून चेल्लाप्पाच्या खुनाची बातमी पसरते आणि सात तरुणी चेल्लाप्पाचा खून आपण केलाय हे सांगून पोलिसांच्या स्वाधीन होतात .आता त्या आठही तरुणी तुरुंगात जातात जिथे नंदिनी आहे.
सक्काराईला खात्री आहे यातील कोणत्याही तरुणीने खून केला नाही .सगळ्याजणी वेगवेगळ्या शहरातून आल्यात ,सगळ्यांचे राहणीमान वेगळे आहेत ,व्यवसाय नोकरी वेगवेगळी आहे. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध दिसत नाही. पण सर्व अनाथ आहेत.वसतिगृहात वाढल्या आहेत.
सक्काराई नंदिनीच्या मदतीने त्यांची माहिती काढतो आणि एक हादरविणारे सत्य त्याच्या समोर येथे.खरे तर या प्रकरणाची सुरवात दहा वर्षांपूर्वीच झालेली असते.एक मोठे कारस्थान यामागे दडलेले आहे.
साध्या खुनापासून सुरू झालेले हे प्रकरण अनपेक्षित वळणे घेत सत्य बाहेर काढते.
No comments:
Post a Comment