खाकी ..द बंगाल चाप्टर
Khakee : The Bengal Chapter
नीरज पांडेंची कलाकृती आहे म्हणजे त्यात वेगळेपणा असणारच आणि ती पाहायलाच हवी.या सिरीजमध्येही त्याने आपल्याला निराश केले नाही.
खाकीचा हा दुसरा सीजन पहिल्या सीजनप्रमाणेच थरारक आणि डावपेचांनी भरलेला आहे.पण एक प्रामाणिक पोलीस अधिकारी काय करू शकतो हे खाकीमध्ये पाहायला मिळते.
शंकर उर्फ बाघा कोलकत्ताचा डॉन .अर्थात सत्ताधारी पार्टीचा वरदहस्त त्याच्यावर आहेच. कोलकात्यातील प्रत्येक काळ्या धंद्यात त्याचा सहभाग आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसआयटी प्रमुख म्हणून सप्तर्षी सिन्हाची नेमणूक होते.सिन्हा प्रामाणिक आणि कायद्यानुसार वागणारा पोलीस ऑफिसर आहे.तो बागाच्या ठिकाणावर धाड मारायचे सुरू करतो. म्हणून बाघाचे विश्वासू साथीदार रणजित आणि सागोर तालुकदार बागाच्या विरोधात जाऊन सिन्हाची हत्या करतात.
सगळे पोलीस आता बागाच्या मागे लागतात. सत्ताधारी पक्षाचा आमदार बरून रॉय बाघाच्या जागी सागोर आणि रणजितला नेमतो. इकडे सिन्हाच्या जागी अर्जुन मैत्राची नियुक्ती होते. तो बागाचे एन्काऊंटर करतो . पण बंगालची गुन्हेगारी आता सागोर आणि रणजितच्या हातात आहे आणि त्यांना मदत करायला बरून रॉय आहे. सागोरला सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळालाय.
ही गुन्हेगारी वाढत जाणार हे लक्षात घेऊन अर्जुन एक वेगळाच डाव खेळतो आणि याची कल्पना काही मोजक्याच ऑफिसर्सना असते.
अर्जुन यात यशस्वी होईल ?? बंगालमधील रणजित आणि सागोरचे गुन्हेगारी वर्चस्व संपुष्टात येईल.
आठ भागाची ही सिरीज पाहताना आपल्या अंगावर काटा येतो.
No comments:
Post a Comment