Sunday, May 4, 2025

EXTERRITORIAL

EXTERRITORIAL
एक्सटेरीटोरीयल
सारा जर्मन स्पेशल फोर्समधील एक सैनिक.तिचा नवरा अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये होता.दोघेही एका संयुक्त मोहिमेत अफगाणिस्तानमध्ये होते.एका मोहिमेत तिचा नवरा आणि युनिटमधील सर्व मारले गेले आणि तीच बचावली.
आता ती आपल्या  सहा वर्षाचा मुलगा  जोश सोबत राहतेय.तिला अमेरिकेत एका सिक्युरिटीचा जॉब मिळाला आहे म्हणून ती जर्मनीतील अमेरिकन एम्बेसीमध्ये व्हिसासाठी आलीय.सोबत तिचा मुलगाही आहे.
व्हिसासाठी तिला जास्तच वेळ लागतोय म्हणून ती जोशला प्ले रूममध्ये सोडते. पण जेव्हा तिचा नंबर येतो तेव्हा जोश गायब झालेला असतो. एम्बेसीमधून एक मुलगा गायब कसा होऊ शकतो .एम्बेसीचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर  एरीक ती एकटीच एम्बेसीत आलीय असे सांगतो .व्हिडिओ फुटेजमध्येही ती एकटीच दिसतेय.तिची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे तिला असे भास होतात असे तिची आई ही सांगते.
साराला खात्री आहे आपल्या मुलाचे अपहरण झालेय .पण का ? कशासाठी ? 
एरिना  एम्बेसीमध्ये नजरकैदेत आहे.योगायोगाने ती साराला भेटते आणि तिच्या मदतीने सारा जोशचा शोध घेण्याचे ठरविते. एम्बेसीचा परिसर मोठा आहे.सर्व ठिकाणी कॅमेरे बसविलेले आहेत. या सर्व सिक्युरिटीला भेदून सारा जोशला शोधून काढले का ?
त्याचे कशासाठी अपहरण झालेय ? यामागचा हेतू काय ? साराला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील का ?
खरा गुन्हेगार समोर येईल का ??
अतिशय थरारक उत्कंठा वाढविणारा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत पाहायला मिळेल .

No comments:

Post a Comment