टेल टेल .…जेफ्री आर्चर
अनुवाद ...लीना सोहोनी
मेहता पब्लिकेशन हाऊस
जेफ्री आर्चरने आपल्या अनुभवातून अनेक कथा ,कादंबरीचे लिखाण केले आहे.टेल टेल हा त्यांचा वेगवेगळ्या अनुभवातून लिहिलेला कथासंग्रह आहे.
एकमेवाद्वितीय ही बरोबर शंभर शब्दाची रहस्यमय कथा आहे.
इटलीतील छोट्याश्या सुंदर गावात मेयरचा खून होतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा खून मीच केला असे त्या तरुण पोलीस अधिकाऱ्याला सांगत असते पण त्याचा खून कोणी कसा केला ते जाणून घेण्यासाठी मेयरला कुणी मारले ही कथा वाचायला हवी.
दमास्कसच्या वाटेवर या कथेत लेखकाचा मित्र आपल्या वडिलांचा उद्योग पुढे न चालवता बिशप का बनतो हे वाचून आपल्याला धक्का बसतो .
द हॉलिडे ऑफ अ लाईफ टाईम मध्ये निवृत्त मध्यमवर्गीय पतिपत्नी इन्शुरन्स कंपनीला कसे गंडवून लाखो रुपये कमावतात याची सुरस कहाणी आहे आणि लेखकाने या कथेचे तीन वेगवेगळे शेवट लिहिले आहेत.
सिनियर व्हाईस प्रेसिडन्ट ही दिर्घ कथा आहे .एका बँकेचा सिनियर व्हाईस प्रेसिडन्ट आपल्या कधीही न भेटलेल्या ग्राहकाला कसे गंडावतो याची कहाणी आहे.
तर वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या जमिनीचा फायदा एक तरुण पार्किंगसाठी कसा घेतो याची सुरस कहाणी आपल्याला द कार पार्क अटेंडन्ट मध्ये आहे.
No comments:
Post a Comment