शिवनेत्र बहिर्जी खंड २..... प्रेम धांडे
रुद्र एंटरप्रायझेस
स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या योगदानाची माहिती देणारे हे पुस्तक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सत्य घटना आणि त्या यशस्वी करण्यामागे बहिर्जी नाईक यांच्या हेरखात्याची कामगिरी यावर हे पुस्तक आहे.
लेखकाने यात आपली कल्पनाशक्ती वापरली आहे हे तो पहिल्यांदाच स्पष्ट करतो. मोहिमा यशस्वी होण्यासाठी हेरखातेही प्रबळ असावे लागते आणि राजांचे डावपेच या हेरखात्यांवर अवलंबून असायचे.बहिर्जीने गेली अनेक वर्षे आपले हेर संपूर्ण भारतात पेरून ठेवले होते.ते हेर सगळीकडे असू शकतात .अगदी आदिलशहा बडी बेगमची प्रमुख दासी अंगरक्षक मर्जीना बहिर्जी नाईकची हेर होती असे म्हटले जाते.
शिवनेत्र बहिर्जीचे एकूण चार खंड आहेत.
No comments:
Post a Comment