शार्लटन्स ....रॉबिन कुक
अनुवाद....उज्वला गोखले
मेहता पब्लिशिंग हाऊस
शार्लटन्स म्हणजेच भोंदू .मेडिकलमध्ये भोंदू अर्थात खोट्या डॉक्टरांना शार्लटन्स म्हटले जाते.
बोस्टनमधील बोस्टन मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच बीएमएच सुप्रसिद्ध आणि अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. आज त्या हॉस्पिटलमध्ये ब्रूस व्हिन्सेंटचे एक छोटे हर्नियाचे ऑपरेशन होणार होते.ब्रूस हॉस्पिटलचा स्टाफ होता.तो पार्किंगमध्ये कामाला होता.त्यामुळे जवळपास प्रत्येक डॉक्टर आणि स्टाफशी त्याची ओळख होती.त्याच्या हसऱ्या आणि मनमिळावू स्वभावामुळेच डॉ. मॅसनसारखे बिझी आणि अनुभवी डॉक्टर त्याची शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले होते.
पण दुर्दैवाने छोट्या चुकीमुळे ब्रूसचा ऑपरेशन टेबलवरच मृत्यू झाला होता. त्याला अँनेस्थेशिया देणारी डॉ एवा लंडनमुळेच त्याचा मृत्यू झालाय असा डॉ. मॅसन आरोप करतात.अर्थात यात डॉ. एवाची काहीच चूक नाही असे चीफ रेसिडन्स डॉक्टर नोहा रोथॅजर सांगतो. पुढे मिटिंगमध्येही तो तिची बाजू घेतो.
पण काही अंतराने अजून दोन पेशंट ऑपरेशन टेबलवरच मृत्यू पावतात. दोन्हीवेळा डॉ. एवा लंडन अनेस्थेशिया देण्यासाठी हजर असते .टेक्निकली यात तिचा काहीच दोष नसतो .हे सगळेच डॉक्टर मान्य करतात . आपत्कालीन स्थितीत जे काही करायचे असते ते सर्वांनीच केले होते.
डॉ. नोहा आणि डॉ. एवा एकमेकांच्या प्रेमात पडतात.पण कधी कधी डॉ. एवा अचानक काही दिवसांसाठी गायब होत असते.ती वॉशिंग्टन येथे एका संस्थेसाठी काम करते असे नोहाला सांगते. डॉ. एवा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. आभासी जगात वावरणे तिला आवडते.
तिला चौकशीतून वाचविताना डॉ. नोहावर स्वतःची नोकरी गमावण्याची पाळी येते.तो डॉ. एवाची माहिती काढायला एक खाजगी गुप्तहेर नेमतो पण त्याचीही हत्या होते.डॉ. नोहावर कोणतरी पाळत ठेवतोय.त्याचा कॉम्प्युटर आणि मोबाईल हॅक केलाय. आता तर काहीजण त्याला मारायला निघालेत.
काय आहे हे प्रकरण ?? डॉ एवा नक्की कोण आहे ? सगळी कागदपत्रे तर ती एक कुशल आणि अनुभवी डॉक्टर आहे हेच सिद्ध करतात.पण आता डॉ नोहावर स्वतःला सिद्ध करायची वेळ आलीय.तो यशस्वी होईल का ??
No comments:
Post a Comment