कर्तव्य
Kartavya
कर्तव्य ....एक अस्वस्थ करणारा अनुभव
आज इन्स्पेक्टर पवन मलिक चाळीसावा वाढदिवस. झारखंडच्या छोट्या झामली गावातील रेल्वे स्टेशनवर आपल्या सहकारी मित्रांसोबत साजरा करतोय. हवालदार अशोक त्याचा खास मित्र . ते स्टेशनवर एका पत्रकार महिलेला संरक्षण द्यायला आलेत.
अध्यात्मिक गुरू आनंद श्री गावात प्रतिष्टित व्यक्ती आहेत. लहान मुलांचा ते बेकायदेशीरपणे वापर करतात असा आरोप त्या महिला पत्रकाराचा आहे आणि त्यासाठीच ती गावात आलीय.
पण रस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो.पवन एका हल्लेखोराला मारतो तर एक निसटून जातो. पण पत्रकार महिलेला वाचवू शकत नाही.
पळून गेलेला हरपाल एक सोळा वर्षाचा मुलगा आहे .पुरावा नष्ट करण्यासाठी आनंद श्रीची माणसे त्या मुलाच्या मागावर आहेत.
पवन त्या मुलाला संरक्षण देतो .पण त्याच्यावरही दबाव आहे. सगळे पोलीस नेते आनंद श्री चे भक्त आहेत.
त्याचा भाऊ दुसऱ्या जातीतील मुलीसोबत पळून गेलाय.पवनचा बाप कट्टर जातीवादी आहे.तो स्वतःच्या हाताने दोघांना ठार करेल याची पवनला खात्री आहे.आता भावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही त्याच्यावर आहे.
वरिष्ठ त्याच्यावर महिला पत्रकाराची केस बंद करण्यासाठी दबाव टाकतात .त्यासाठी ते हरपालला ठार मारण्याची ऑर्डर देतात. पवन चारही बाजूने यात दाबला गेलाय.
तो हरपालला वाचविण्यासाठी आनंद श्री सोबत समजोता करतो आणि त्याला अशोकसोबत अज्ञात ठिकाणी पाठवतो .
पण नंतर काही अश्या गोष्टी घडतात त्या ऐकून पवन हादरून जातो.
पवन परिस्थितीला शरण जाईल की त्याविरुद्ध उभे राहण्याचे ठरवेल ?
सैफ अली खान पवनच्या भूमिकेसाठीच तयार झालाय. हतबल असहाय आणि नंतर संतापाने पेटून उठणारा पवन अप्रतिम आहे.
दिल्ली क्राईमच्या तीनही सिझनमध्ये गाजलेली रसिका दुग्गल पवनच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.तर झाकीर हुसेन आणि संजय मिश्रा नेहमीसारखेच अप्रतिम .
No comments:
Post a Comment