व्हेक्टर .....रॉबिन कुक
अनुवाद ..डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
अमेरिकेच्या मॅनहटन शहरातील गालिचा विक्रेता जेसन पपारिसला पोस्टाने एक बंद लिफाफा आला. नेहमीप्रमाणे त्याने ते फोडले आणि त्यातून पावडर बाहेर पडली .तो शिंकेने आणि खोकल्याने हैराण झाला आणि दोन दिवसाने तो मृत्यू पावला.
डॉ. जॅक स्टेपलटन शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. त्याला अवघड केसेसचे पोस्टमार्टेम करणे आवडते.जैविक शास्त्राचा तो अभ्यासक आहे.जेसनचे पोस्टमार्टेम करताना तो अँथ्राक्सच्या जैविक अस्त्राचा बळी आहे हे समजते.अमेरिकेच्या इतिहासात मोजून बोटावर मोजता येतील एव्हढ्याच अँथ्राक्सच्या केस झाल्यात .तो या गोष्टीचा छडा लावायचा ठरवतो.
युरी टॅक्सी ड्रायव्हर आहे.तो राशियातून आलाय .तिथे तो जैविक अस्त्रांच्या कारखान्यात काम करायचा. रशियाने जैविक अस्त्रे बनविण्याचे बंद केल्यामुळे तो अमेरिकेत पळून आलाय आणि टॅक्सी चालवतोय.तो ज्यू द्वेष्टा आहे. अमेरिकेत अजूनही काही नाझीवादी तरुण आहेत .त्यांची पीपल आर्मी नावाची संघटना आहे.फेडरल बिल्डिंग या शासकीय इमारतीत जैविक हल्ला करून हजारो लोकांची हत्या करण्याचा त्यांचा प्लॅन आहे त्यासाठी युरी अँथ्राक्सची पावडर बनवतो आहे.
डॉ .जॅक अँथ्राक्सच्या जिवाणूंचा माग घेताना अनेक गोष्टी त्याच्यासमोर येतात आणि तो स्वतः संकटात सापडतो.
पीपल आर्मीचा जैविक हल्ला यशस्वी होईल का ? सत्य काय आहे हे डॉ. जॅक शोधून काढेल ला ? जैविक हल्ल्यावर आधारलेली एक थरारक कहाणी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.
No comments:
Post a Comment